केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्वासन

रांची (झारखंड) – नाशिक (महाराष्ट्र) येथील टी.सी.एस्. सारख्या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय आस्थापनात अनेक हिंदु महिला कर्मचार्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, बलपूर्वक गोमांस खाऊ घालणे आणि नमाजपठण करण्यास भाग पाडणे, या भयावह घटना समोर आल्या आहेत. या केवळ एका ठिकाणच्या नाहीत. हा एका राष्ट्रव्यापी ‘कॉर्पोरेट जिहाद’चा भाग असू शकतो.
🚨 Ranchi (Jharkhand): Issues of “Corporate Jihad” and religious conversions in MNCs are serious and will be discussed with the Union Home Minister, said Union Law Minister @arjunrammeghwal@HinduJagrutiOrg’s Northeast India Coordinator@Shambhu_HJS submitted a memorandum… pic.twitter.com/TQNmBccNOZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2026
या गंभीर विषयाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा केंद्रीय संस्कृती अन् संसदीय कार्य मंत्री श्री. अर्जुन राम मेघवाल यांची, तसेच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांची भेट घेतली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना निवेदन दिले.

याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ, विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्य अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, समितीच्या पूजा चौहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय मंत्री श्री. अर्जुन मेघवाल यांनी आश्वासन देतांना सांगितले की, बहुराष्ट्रीय आस्थापनांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतर हे विषय गंभीर असून केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. याच विषयावर रांची महानगरपालिकेच्या महापौर रोशनी खलखो आणि उपमहापौर श्री. नीरज कुमार यांनाही निवेदन देण्यात आले.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ