
काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी अमेरिकेचे विशेष दूत सर्गिओ गोर यांना भेटण्यास नकार दिला. गोर यांनी नेपाळमध्ये जाऊन शाह यांच्याकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती; परंतु शाह यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. सर्गिओ गोर हे भारतात अमेरिकेचे राजदूत आहेत.
After the Maldives, even Nepal’s PM has reportedly declined a meeting with Sergio Gor 🇳🇵
Small nations are now openly pushing back against the U.S.
The sooner Donald Trump and America recognize how arrogance and erratic conduct have led to this global perception shift, the… pic.twitter.com/FUpRg8QHd2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2026
ही भेट नाकारण्यामागे ‘नेपाळच्या पंतप्रधान सध्या अंतर्गत प्रशासन आणि धोरणात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रित करत आहेत’, ‘पंतप्रधान केवळ राष्ट्राध्यक्ष किंवा परराष्ट्रमंत्री यांसारख्या उच्च स्तरावरील व्यक्तींचीच भेट घेतील, अशी नवीन परंपरा शाह यांना चालू करायची आहे’, तसेच ‘नेपाळला भारत, अमेरिका आणि चीन यांच्यात संतुलन राखायचे असून कोणत्याही गटात सहभागी होण्यापासून दूर रहाणे हे त्यांचे प्राधान्य आहे’, ही ३ कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतरही सर्गिओ गोर यांनी त्यांचा नेपाळ दौरा अत्यंत यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यांनी नेपाळचे अनेक मंत्री आणि नेते यांची भेट घेतली अन् व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य वाढवणे, यांविषयी चर्चा केल्याचे सांगितले.
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनीही नाकारली होती भेट !
नेपाळच्या आधी मालदीवमध्येही सर्गिओ गोर यांना मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइझू यांनी भेटण्यास नकार दिला होता. मुइझू सरकारने स्पष्ट केले होते की, मालदीवला कोणत्याही बाह्य संघर्षात, विशेषतः आखातातील प्रश्नांवर अमेरिकशी चर्चा करण्यात रस नाही. मालदीव स्वतःच्या भूमीचा वापर कोणत्याही सैनिकी कारवायांसाठी होऊ देणार नाही.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman