
तेहरान/वॉशिंग्टन – इराणने संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेविरुद्ध तक्रार केली आहे. ‘तेहरान टाइम्स’च्या वृत्तानुसार एका औपचारिक पत्राद्वारे इराणने अमेरिकेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इराणचा असा दावा आहे की, इराणी नौका जप्त करून अमेरिकेने ‘समुद्री लुटमारीचे’ कृत्य केले आहे. इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आवाहन केले की, त्याने अमेरिकेच्या या कृतीचा निषेध करावा आणि याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी.
America seizing commercial ships and calling it “law enforcement” is nothing but maritime piracy, says Iran in its complaint to the United Nations.
The UN is a puppet of the United States. Therefore, it is a fact that it will not give any weight to Iran's complaints#Iranwar… pic.twitter.com/bdsPncA2bU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2026
संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरावानी यांनी सांगितले की, अमेरिकेने ‘मॅजेस्टिक’ आणि ‘टिफनी’ नावाच्या दोन नौका कह्यात घेतल्या. याखेरीज इराणचे अनुमाने ३८ लाख बॅरल तेलही जप्त केले. ही कारवाई अवैध असून ती आंतरराष्ट्रीय व्यापारात केलेला हस्तक्षेप आहे. अमेरिकेचे हे वर्तन संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदे आणि सागरी कायद्यांचे उल्लंघन करणारे आहे. जर अशा कारवायांना आळा घातला गेला नाही, तर त्यामुळे एक धोकादायक पायंडा पडू शकतो. यामुळे जागतिक स्तरावर कायद्याचे राज्य कमकुवत होईल, अशी चेतावणीही इरावानी यांनी दिली.
ट्रम्प यांनी इराणचा युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला !
इराणने अमेरिकेला प्रस्ताव दिला होता की, इराणच्या अणू कार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडला, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा चालू करू. तथापि ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता