छत्रपती शिवरायांनी केलेली व्रते आणि पूजा

नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘३५० गड जिंकून एकाही किल्ल्यावर सत्यनारायणाची किंवा वास्तूशांतीची पूजा न घालणारे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. आम्ही जन्मापासून मरेपर्यंत शांतीच करत असतो’, असे वक्तव्य केले होते. त्यावर धर्मप्रेमी श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेले खंडण येथे देत आहोत.

 

छत्रपती शिवाजी महाराज

१. रायरेश्वराच्या ठिकाणी एक वर्ष प्रदोषव्रत करून मग शपथ घेतली.

२. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि प्रबळदुर्ग हे तीनही किल्ले बांधत असतांना पायाभरणी करून पंचांगस्थ ज्योतिष विद्येनुसार त्या संवत्सराचे नाव जे होते, ते नाव त्या किल्ल्याला दिले.

३. मेहुणे बजाजी निंबाळकर आणि पुढे पुतळाबाईंचे काका नेताजी पालकर यांचे बळजोरीने झालेल्या धर्मांतरासमोर अनुक्रमे शिखर शिंगणापूर अन् रायगड येथे शुद्धीकरण केले.

४. ग्रहण काळात आईची आणि वडिलांचे प्रधान सचिव सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला महाबळेश्वर मंदिर प्रांगणात केली. ग्रहण काळात सुवर्णदान वृद्धाप दोष, शरीरस्थ रोगादी दोषांचे हरण करतो, हे ठाऊक असल्याविना कुणीही करत नाही.

५. अफझलखान भेट ठरवून राहु काळात घडवून आणली.

६. राजापूरची गंगा प्रगट झाल्यावर स्नान केले.

७. श्रीशैल मल्लिकार्जुन येथे पावणे दोन प्रहर (अनुमाने साडेपाच घंटे) एकाग्र दृष्टीने ध्यानस्थ होते. महाराजांसारखे योगाभ्यासी असणे, हे आजही दुर्लभ आहे.

८. महाराजांनी आयुष्यभर स्वतःसमवेत स्फटीकाचे शिवलिंग बाळगले.

९. महाराज परमेश्वर चरणी विलीन झाले, त्याच वेळेस महाड, माणगाव, म्हसाळा आणि लोणेरे भागात धरणीकंप झालेला आहे. (इंग्रजांकडे नोंदी उपलब्ध)

अजून अनेक गोष्टी आहेत की, ज्या बखर, रियासत, जेधे शकावली यांमध्ये आहेत, ज्यावरून हा निष्कर्ष निघेल की, पुण्यश्लोक महाराज स्वतः अतिशय चाणाक्ष आणि ज्योतिर्विद होते.

– श्री. श्रीनिवास कुलकर्णी, एक शिवप्रेमी