सिंधुदुर्ग गडावरील ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिराचे अनुदान वाढवण्याचे प्रकरण

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग गडावर छत्रपती राजाराम महाराज यांनी वर्ष १६९५ मध्ये ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिराची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन होणारे हे भारतातील एकमेव मंदिर असून या ऐतिहासिक स्थळासाठी वर्ष १९७१ पासून महसूल विभागाकडून अत्यल्प अनुदान दिले जात आहे. मंदिराची दयनीय अवस्था आणि अत्यंत तोकडे अनुदान यांविषयी चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत आमदार जगताप यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना एका पत्राद्वारे मंदिराच्या वार्षिक अनुदानात भरीव वाढ करून मंदिर आणि परिसराच्या संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अनुदान वाढवण्याचे निर्देश दिले होते, तरीही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्याविषयी आमदार जगताप यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर