संतप्त तालिबानने पाकिस्तानच्या ६ सैनिकांना ठार मारले

काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानी सैन्याने एका अफगाण बालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या तालिबानच्या सुरक्षा दलाने ६ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. कंधार प्रांतात असलेल्या स्पिन बोल्डक जिल्ह्यातील अंगूर अड्डा या क्षेत्रात असलेल्या जलोल खेल भागातील सीमेवर ही चकमक झाली. एका पाकिस्तानी सैनिकाला पकडण्यात आले आहे. या चकमकीनंतर तलिबानच्या सुरक्षा दलांनी पाकिस्तानी सैनिकांकडील शस्त्रे कह्यात घेतली आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानच्या ‘जिओ टीव्ही’ने याविषयीचे वृत्त प्रसारित करतांना म्हटले आहे की, ‘दक्षिण वझिरिस्तानमध्ये अफगाण तालिबानने केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह तीन सामान्य नागरिक घायाळ झाले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने या घटनेला ‘फितना अल्-खवारिज’ (आतंकवाद्यांच्या घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न) असे म्हटले आहे.’
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !