मंदिरात करणार होता बाँबस्फोट

मंगळुरू (कर्नाटक) – येथील कुकर बाँबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी महंमद शारिक याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शारिकने न्यायालयात गुन्हा मान्य केला होता. यानंतर हा निकाल देण्यात आला.
| काय आहे प्रकरण ?
१९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मंगळुरूमधील कांकनाडी भागात एका चालत्या रिक्शामध्ये कुकर बाँबचा स्फोट झाला होता. आरोपी महंमद शारिक प्रेशर कुकरमध्ये बाँब घेऊन तो एका मंदिरात ठेवण्यासाठी जात होता; मात्र टायमरच्या चुकीच्या सेटिंगमुळे (९० मिनिटांऐवजी ९ मिनिटे सेट झाल्यामुळे) हा बाँब वाटेतच रिक्शामध्ये फुटला. या स्फोटात शारिक आणि रिक्शाचालक दोघेही गंभीर घायाळ झाले होते. अन्वेषणात समोर आले होते की, शारिकचा उद्देश येथील मंजुनाथ मंदिरात बाँबस्फोट घडवून धार्मिक तणाव निर्माण करणे, हा होता. तो ‘इस्लामिक स्टेट’कडून प्रेरित असलेल्या शिवमोग्गा मॉड्युलचा (आतंकवादी कृत्यांचे नियोजन आणि त्याची कार्यवाही यासाठी बनवलेली स्थानिक तुकडी) सक्रीय सदस्य होता. त्याचा यापूर्वीच्याही अनेक देशविरोधी कारवायांमध्ये हात होता. |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !