अमली पदार्थ माफियाचा हात असल्याचा संशय

बोगोटा (कोलंबिया) – दक्षिण अमेरिकी देश कोलंबियाच्या नैऋत्य भागात बसवर आतंकवादी आक्रमण झाले. २५ एप्रिलला झालेल्या बाँबस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३८ जण घायाळ झाले. सैन्यदलप्रमुखांनी या घटनेचे वर्णन ‘आतंकवादी आक्रमण’ असे केले आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेनुसार हा स्फोट काउका प्रांतातील काजिबियो भागात असलेल्या पॅनअमेरिकन महामार्गावर झाला.
१. प्रांताचे गव्हर्नर ऑक्टावियो गुजमान यांनी सांगितले की, स्फोटके रस्त्यात पेरण्यात आली होती आणि बस तिथून जात असतांनाच त्यांचा ‘रिमोट’च्या साहाय्याने स्फोट घडवून आणण्यात आला.
२. कोलंबियाच्या सशस्त्र दलांचे कमांडर जनरल ह्युगो लोपेझ यांनी या आक्रमणासाठी ‘इवान मोर्दिस्को’ नावाचे कुख्यात गुन्हेगारी जाळे आणि ‘जैमे मार्टिनेज’ गटाला उत्तरदायी धरले आहे.
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त