वैशाख शुक्ल नवमी (२५.४.२०२६) या दिवशी ‘सीता नवमी’ झाली. त्यानिमित्त सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना सीतामातेविषयी मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान आपण २५ एप्रिलला पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया. (भाग २)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1033330.html
६. सीतामातेची गुणवैशिष्ट्ये
६ अ. सहनशीलता : ‘सीतामातेमध्ये पुष्कळ सहनशीलता होती. त्यामुळे तिने वनवासातील कठोर यातना हसत हसत सहन केल्या. रावणाने तिचे हरण करून तिला लंकेतील अशोकवाटिकेत ठेवले. तेव्हा तिने तेथील राक्षसिणींचा दुर्व्यवहार आणि ऊन, वारा अन् पाऊसही आनंदाने सोसले. यावरून तिच्यातील पराकोटीच्या सहनशीलतेची प्रचीती येते.
६ आ. धर्मपरायण असल्याने सर्वार्थांनी आदर्श असणे : सीतामातेने धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तंतोतंत धर्माचरण केले. त्यामुळे ती ‘आदर्श पुत्री, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श वहिनी, आदर्श सून आणि आदर्श महाराणी’ होती.
६ इ. महापतीव्रता आणि क्षमाशील वृत्ती : सीतामातेच्या मनात पतीच्या रूपात केवळ प्रभु श्रीरामाचाच वास होता. त्यामुळे रावणाच्या बंदीवासातून मुक्त झाल्यावर महापतीव्रता जानकीला तिचे पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी अग्नीपरीक्षा देण्याची किंवा अयोध्येचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नव्हती, तरी तिने ते केले. ‘तिच्या पातिव्रत्याची महानता सर्वांच्या लक्षात यावी’, यासाठी प्रभु श्रीरामाने तिला अग्नीपरीक्षा देण्यास सांगितले आणि प्रजेच्या शंकेवरून तिला वनवासात पाठवले. या दोन्ही प्रसंगांतून सीतामातेचे पातिव्रत्य उजळून निघाले आणि सर्वांनाच तिच्या धवल चारित्र्याची निश्चिती झाली. जेव्हा सीता-राम अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येच्या जनतेने सीतेच्या पातिव्रत्यावर शंका उपस्थित केली. त्यामुळे प्रभु श्रीरामाला सीतेचा त्याग करून तिला वनवासात पाठवावे लागले. तेव्हाही सीतेच्या मनात प्रभु श्रीराम आणि प्रजाजन यांच्याप्रती अत्यंत प्रीती होती. त्यामुळे तिने त्यांना मनोमन क्षमा केली.
६ ई. प्रीतीमय आचरण : सीता ही साक्षात् भूदेवीचा अवतार होती; परंतु तिचा स्वभाव प्रीतीमय, रहाणीमान अत्यंत साधे आणि आचरण धर्मानुकूल होते. तिच्या प्रीतीमय आणि वात्सल्यमय आचरणामुळे तिच्या संपर्कात येणार्या सर्वांना तिच्याविषयी आपुलकी अन् जवळीक वाटत होती.
६ उ. संस्कारशील : सीतामाता अत्यंत विनम्र आणि संस्कारशील वृत्तीची होती. त्यामुळे तिने तिचे पुत्र लव आणि कुश यांच्यावरही उत्तम संस्कार करून त्यांना चांगले सुपुत्र अन् उत्तम राजपुत्र म्हणून घडवले.
६ ऊ. परम त्यागी : सीता महाराणी असूनही निरासक्त होती. तिने प्रभु श्रीरामाच्या प्रेमापोटी राजप्रासादाचा आणि राजकीय सुखांचा त्याग करून वनवास स्वीकारला. त्याचप्रमाणे जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले होते, तेव्हा सीतेने रावणाची पट्टराणी होण्याचा अस्वीकार करून अशोकवाटिकेत ऊन, वारा आणि पाऊस सहन करणे सहज स्वीकारले. तिला राजकीय वैभव किंवा राजकीय सुख यांचा लेषमात्रही मोह नव्हता. ती प्रभु श्रीरामाप्रमाणे परम त्यागी होती. रामायणामध्ये ‘पंचवटीत असतांना सीतेला सुवर्ण मृगाचा मोह झाला होता’, असा उल्लेख आढळतो; परंतु सीता ही परम त्यागी असल्यामुळे तिला सुवर्ण मृगाचा मोह झाला नव्हता.रावणाने मारीच राक्षसाच्या मदतीने सुवर्ण मृग बनून राम-लक्ष्मण यांना पंचवटीपासून दूर नेले आणि सीतामाईचे अपहरण केले.‘केवळ प्रभु श्रीरामाची लीला घडावी आणि रावणाचा अंत व्हावा’, यासाठी ती सुवर्ण मृगासाठी हट्ट करत ईश्वरी लीलेत सहभागी झाली होती.
७. सीतामाता आणि तिच्या भगिनी यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
८. सीतामातेतील विविध प्रकारच्या तेजांमुळे झालेले दैवी कार्य !
९. सीतामाता आणि प्रभु श्रीराम यांच्यातील नाते

सीतामातेने प्रभु श्रीरामाची कांताभक्ती केली. त्यामुळे तिचे पातिव्रत्य प्रबळ होते. ज्याप्रमाणे समुद्राची लाट समुद्रापासून कधीच विलग होत नाही आणि समुद्रातच सामावून जाते, तसे सीतामातेचे बाह्य रूप जरी प्रभु श्रीरामापासून निराळे दिसत असले, तरी तिचे आंतरिक स्वरूप आणि अस्तित्व प्रभु श्रीरामाशी पूर्णपणे एकरूप झाले होते. जेव्हा सीतेचे स्वयंवर झाले, तेव्हा जणू भूमीचा आकाशाशी शुभविवाह झाला. ही एकरूपता केवळ भौतिकदृष्ट्या नसून ते आध्यात्मिकदृष्ट्याही धर्मपरायण असणारे उत्तम दांपत्य आणि आदर्श पती-पत्नी यांचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे.
१०. सीतामातेचे सुपुत्र कुश आणि लव हे श्रीविष्णूच्या शारंग धनुष्याचे जुळे अवतार होते.
११. सीतामातेची अवतारसमाप्ती
सीतामातेच्या अवतारसमाप्तीच्या वेळी तिची स्थुलातील काया भूमीमध्ये सामावून गेली. अशा प्रकारे सीतामातेचे भूमीतत्त्व भूमीत विलीन झाले आणि ती मूळ भूदेवीच्या रूपात प्रगटली.
१२. सीतामाता असे साक्षात् भूदेवीस्वरूप जगज्जननी ।
धन्य सीतेची सहनशक्ती, धन्य तिची क्षमावृत्ती ।
धन्य सीतेची अलोट प्रीती, धन्य तिची रामभक्ती ।। १ ।।
पातिव्रत्याची साक्षात् मूर्ती, त्रिभुवनात गाजली तिची कीर्ती ।
असे ही भव्य विभूती आणि दिव्य असे तिची अनुभूती ।। २ ।।
राजा जनकाची नंदिनी, प्रभु श्रीरामाची झाली अर्धांगिनी ।
कुश-लवांची ती जननी, साक्षात् भूदेवीस्वरूप जगज्जननी ।। ३ ।।
‘प्रभु श्रीरामासमान सर्वार्थांनी आदर्श असणारी सीतामाता परम वंदनीय आहे. भूदेवीचा अवतार असलेल्या माता सीतेच्या चरणी कोटी कोटी नमन !
हे सीतामाते, ‘तुझी कृपादृष्टी आम्हा साधकांवर अशीच अखंड राहू दे आणि आमच्याकडून श्री गुरूंना अपेक्षित अशी साधना होऊ दे. आम्हाला ईश्वराला अपेक्षित असे धर्माचरण करण्यासाठी शक्ती आणि बळ दे’, हीच तुझ्या सुकोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.’ (समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२६)

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !