अमेरिकेतील विद्यापिठांतून कथित संशोधनाच्या नावाखाली हिंदु धर्मातील तत्त्वांवर, तसेच पर्यायाने हिंदुत्वाच्या विचारसरणीवर वैचारिक आघात करण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली काही दशके चालू आहे. यामध्ये साम्यवादी विचार, पाश्चात्त्य मनोवैज्ञानिक, लेखक आदींच्या विचारांच्या आधारे हिंदु धर्मातील सूत्रांचा अत्यंत विकृत अर्थ लावून आणि श्रद्धास्थानांचे अत्यंत अश्लाघ्यरित्या भंजन करून बुद्धीभेद केला जात आहे. सध्या भारतात साम्यवादी आणि पुरोगामी विचारांचा (पत्रकार, लेखक आदी) जो बुद्धीवादी वर्ग आहे, तो असे विचार पसरवणार्यांचा अनुयायी आणि समर्थक आहे. त्यांच्या कार्यात जगद्गुरु शंकराचार्यांसारखे हिंदूंसाठी आदरणीय धर्मधुरीण सहभागी असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र हिंदुविरोधी विचारांचा बौद्धीक स्तरावर प्रचार केला जात आहे. भारतातील हिंदुद्वेषाचे आणि हिंदूंच्या बुद्धीभेदाचे मूळ स्रोत हे अमेरिकेतील विद्यापिठांत कसे आहे ?, हे या मालिकेतील लेखांवरून लक्षात येईल. विशेष म्हणजे या विद्यापिठांतील हे हिंदुद्वेष्टे विचार पसरवणार्या विभागांना भारतातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगपतींकडून निधीपुरवठा होत आहे, म्हणजे भारतातील उद्योगपतींच्या निधीचाच वापर करून एकप्रकारे हिंदूंचेच श्रद्धाभंजन करून हिंदूबहुल भारत राष्ट्राला तोडण्याचे भयंकर काम अमेरिकेतील विद्यापिठांच्या माध्यमातून होत आहे. हे सर्व कसे होत आहे ?, हे पुढील काही लेखांतून येथे देत आहोत.
(भाग १)

१. अमेरिकेतील विद्यापिठांकडून हिंदुविरोधी परिषदेचे आयोजन !
अमेरिकेतील ‘रटगर्स’ या नावाच्या विद्यापिठाने सप्टेंबर २०२१ मध्ये ‘हिंदुत्वाचा विध्वंस’ (डिसमेंटलिंग हिंदुत्व) या नावाने ऑनलाईन एका मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे अमेरिकेतील ५० हून अधिक विद्यापिठांनी त्याचे सहप्रायोजकत्व केले होते.
२. हिंदुत्व ही अन्यायकारक विचारसरणी असून तिला नष्ट करण्याच्या हेतूने आयोजन

या परिषदेचा मुख्य हेतू ‘हिंदुत्वा’ला हिंदु धर्मापासून वेगळे दाखवणे आणि ‘हिंदुत्व ही विचारसरणी अल्पसंख्यांक, दलित अन् महिला यांवर अन्याय करणारी, अत्याचाराला प्रोत्साहन देणारी कशी आहे ?’, हे दाखवण्याचा होता. त्यामुळे ‘या हिंदुत्वाच्या विचारसरणीचे एक एक पदर उलगडून तिला नष्ट केले पाहिजे’, असे विचार या परिषदेत मांडले गेले, तसेच त्यांना अभिप्रेत हिंदु धर्मातील मूळ तत्त्वांचीही त्यांना अपेक्षित अशी विकृत मांडणी केली आहे; जेणेकरून हिंदूंचे पूर्णतः खच्चीकरण होईल आणि ते हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांना तुच्छ लेखतील.
३. रटगर्स विद्यापिठाकडून शैक्षणिकसंशोधनाच्या नावाखाली हिंदुत्वविरोधी अहवाल
रटगर्स विद्यापिठात २६ ऑक्टोबरला २०२५ या दिवशी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यापिठाच्या ‘सुरक्षा, वंश आणि हक्क केंद्रा’ने (‘सेंटर ऑफ सेक्युरिटी, रेस अँड राईट्स’ने) शैक्षणिक संशोधनाच्या नावाखाली ‘अमेरिकेतील हिंदुत्व : बहुसंख्य समाजाची समता आणि धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती’ (हिंदुत्व इन अमेरिका : अ थ्रेट टू इक्वालिटी अँड रिलिजियस पोलॅर्लिझम’) या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला.
४. हिंदुद्वेष्ट्या ऑड्रे ट्रश्के या कार्यशाळेच्या वक्त्या
या कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या ऑड्रे ट्रश्के (Audrey Truschke) या रटगर्स विद्यापिठातील ‘इतिहास आणि दक्षिण आशियाई अभ्यास विभागा’च्या प्राध्यापिका आहेत. त्या त्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेसाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदु धर्म आणि देवता यांचा अत्यंत द्वेषपूर्ण शब्दांत अवमान केला आहे. त्यांनी प्रभु श्रीरामचंद्रांना ‘स्त्रियांचा तिरस्कार करणारे डुक्कर’ (मिसॉजिनी पिग) असे संबोधले. त्यांनी ‘भगवद्गीतेने ‘सामूहिक हत्याकांड’ (मास स्लॉटर) तर्कसंगत (योग्य) ठरवले’, असा आरोप केला आहे. त्यांनी औरंगजेबाने केलेला हिंदु वंशविच्छेद नाकारून त्यांच्या इतिहास संशोधनाच्या नावाखाली त्याचे उदात्तीकरण केले.
अमेरिकन नागरिकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी संबंध न ठेवण्याच्या आणि हिंदुत्वाला निर्बंध अन् अटकाव करण्याच्या अमेरिकेत सूचना !

रटगर्स विद्यापिठाने हिंदुत्वाला अटकाव करण्यासाठी पुढील सूचनाही केल्या आहेत. यामध्ये अमेरिकेतील राजकारणी, नीती (नियम) ठरवणारे, तसेच ‘सिव्हिल सोसायटी’ (नागरी समाज) यांमधील कुणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी संबंध ठेवू नयेत. त्यासाठी ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन, कोहाना’, ‘हिंदु स्टुडंट कौन्सिल’, ‘हिंदु मंदिर कार्यकारिणी परिषद’ यांसारख्या प्रमुख हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य केले आहे. एवढ्यावरच न थांबता ‘अमेरिकी सरकारने हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीला समर्थन वा व्यावहारिक साहाय्य कारणार्यांवर निर्बंध घालावेत आणि त्यांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये. अमेरिकेतील विद्यापिठांनी हिंदुत्वाच्या आक्रमक विचारसरणी आणि संघटना यांविषयी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी अन् कर्मचारी यांना अवगत करावे’, अशा सूचनाही या विद्यापिठाकडून करण्यात आल्या आहेत. – श्री. नागेश जोशी
५. हिंदुत्वाची विचारसरणी अल्पसंख्यांकविरोधी असल्याने तिला अटकाव करण्याचा अहवालातून दुष्प्रचार !
बर्याच हिंदूंना वाटेल की, अमेरिकेतील विद्यापिठात घडणार्या एखाद्या कार्यशाळेविषयी आपल्याला काय देणे घेणे ? पण जर हा अहवाल व्यवस्थित वाचला, तर लक्षात येते की, त्यामध्ये ‘हिंदुत्व’ ही नाझीवादी, अल्पसंख्यांकविरोधी, तसेच ‘नागरिक हक्कांची पायमल्ली करणारी’ आणि ‘सवर्णांचे वर्चस्व निर्माण करणारी’ विचारसरणी आहे’, असे म्हटले आहे. त्यामुळे ‘ही विचारसरणी समाजविघातक आहे आणि अमेरिकेत तिला अटकाव केला पाहिजे’, असे मत या अहवालात दिले आहे. हिंदुत्वाच्या विचारसरणीमुळे अमेरिकेतील मुसलमान, शीख आणि हिंदु यांच्या खालच्या जातींना धोका आहे, असे या अहवालात दर्शवण्यात आले आहे.
६. विद्यापिठांच्या सूचना, म्हणजे अहवालाच्या नावाखाली काढलेला आदेशच !
‘हिंदुत्वाचा विध्वंस’ (डिसमेंटलिंग हिंदुत्व) परिषदेला ५० हून अधिक अमेरिकेतील विद्यापिठांचे सहप्रायोजकत्व होते, हे लक्षात घेतले, तर या अहवालातील सूचना अमेरिकेतील अन्य विद्यापिठांनी कृतीत आणल्यास आश्चर्य वाटायला नको. पूर्वी हिंदुत्वविरोधी परिषद घेऊन वैचारिक बुद्धीभेद केला आणि आता कृतीच्या स्तरावर हिंदुत्वापासून दूर करण्यासाठी या अहवालाच्या नावाखाली हिंदुत्वविरोधाचा आदेशच विद्यापिठाने काढला आहे. असे अहवाल प्रसिद्ध करून अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणारे हिंदु विद्यार्थी, तसेच अमेरिकेत कामानिमित्त वा व्यवसायासाठी जाणार्या हिंदूंनाही हिंदुत्वापासून परावृत्त करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे. या माध्यमातून अमेरिकेतील हिंदूंचीही दिशाभूल होऊ शकते आणि तेही धर्मच्युत होऊ शकतात.
७. हिंदुविरोधी विचारसरणी जगभर पसरवण्याचे षड्यंत्र !
कदाचित् कुणाला वाटेल की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या सध्याच्या विचित्र धोरणांमुळे अमेरिका एकाकी पडत आहे; परंतु तरीही ती अद्यापही एक आर्थिक, तसेच शैक्षणिक महासत्ता आहे. तिथे बनणारे (हिंदुविरोधी) नियम जगात अमेरिकेतील विद्यापिठे आणि त्यांची आस्थापने यांच्या मार्गे जगभर पसरवले जातात. तशी यंत्रणा त्यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ विचारवंत आणि भारत सरकार यांनी याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.
ही विद्यापिठे अहवालांच्या माध्यमातून किती घृणास्पद आणि द्वेषपूर्ण हिंदुविरोधी विचार पसरवत आहेत आणि भारतातील कथित बुद्धीवादी त्याचा कसा अनुनय करत आहेत, हे पुढील भागांत पाहू.
– श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती, पुणे.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1036267.html
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?