बेपत्ता झाल्याच्या ३ दिवसांनंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
हत्या करण्यात आल्याचा संशय

कॉक्स बाजार (बांगलादेश) – येथे ३५ वर्षीय नयन दास यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २२ एप्रिल या दिवशी त्यांचा मृतदेह दुर्गम डोंगराळ भागात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. नयन दास हे नागपंचमी मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होते. ते गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होते.
A temple priest found dead under suspicious circumstances in Bangladesh – Suspected to be a murder.
This incident makes it clear that attacks on Hindus were occurring even during former PM Sheikh Hasina’s tenure, that cycle continues uninterrupted during Muhammad Yunus’s interim… pic.twitter.com/z1fVAjDRTP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2026
अज्ञातांनी घरातून बोलावून नेले होते !
नयन दास यांच्या कुटुंबियांच्या मते, त्या रात्री काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना घराबाहेर बोलावून नेले होते. त्यानंतर ते परत आले नाहीत. बराच शोध घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. २२ एप्रिलला दुपारी स्थानिक लोक शोध घेत असतांना मंदिराच्या मागील डोंगराळ भागात त्यांचा मृतदेह दिसून आला.
दास यांच्या गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला आढळला, त्यामुळे हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या मते, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पोलीस त्या अनोळखी व्यक्तींचा शोध घेत आहेत, ज्यांनी त्यांना रात्री घरातून बोलावून नेले होते.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !