गुन्हेगारांना पोलिसांचा वचक नसल्याचा परिणाम !

पुणे – ५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या दोघांना पोलिसांनी कह्यात घेतले. चहा विक्रेत्याच्या प्रसंगावधानामुळे ते ढोले पाटील रस्त्यावर पकडले गेले. ओमप्रकाश अगरवाल आणि मौसम मिश्रा अशी त्यांची नावे आहेत. अशोक बिदनकर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अगरवाल आणि मिश्रा यांनी बिदनकर यांच्या चहाच्या टपरीवर येऊन ५०० रुपयांची बनावट नोट देऊन सिगारेट खरेदी केली. तक्रारदारांच्या आईच्या निदर्शनास नोट बनावट असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !