
अकोला – येथील बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड गावात गोमांसाच्या वाहतुकीच्या संशयावरून गोरक्षकांनी एका मुसलमानाला पकडले. यानंतर त्याने त्याच्या सहकार्यांना तेथे बोलावले. तेथे काही वेळातच २० ते २५ मुसलमान जमले. त्यांनी गोरक्षकांशी वाद घातला. (उद्दाम मुसलमान ! – संपादक) ‘पोलीसही तेथे आले; पण त्यांनी गोमांस वाहतूक करणार्या मुसलमानावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याला सोडून दिले आणि त्याच्याकडील मालही परत केला; पण गोरक्षकांवर कारवाई केली’, असा आरोप भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केला.
‘या वेळी मुसलमानांच्या हातात लोखंडी पाईप होते आणि ते दादागिरी करत होते; पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, तसेच निष्काळजीपणा करणार्या पोलीस कर्मचार्यांचे निलंबन करावे’, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.
संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे ! – पोलीस अधीक्षक
अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले, ‘‘संबंधित तरुणाला सोडून देण्यात आले नव्हते. घटनास्थळी अनुमाने १५० हून अधिक लोकांची गर्दी जमल्याने त्याला पोलिसांच्या देखरेखीखाली पुढे पाठवण्यात आले. संबंधिताला कह्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’’ (गोरक्षकांचे संघटन आणि त्यांचा दबाव पाहून पोलिसांनी अशी कारवाई केली नसेल कशावरून ? – संपादक)
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !