Hassam Ahmed : उत्तरप्रदेशातील ‘के.जी.एम्.यू.’मधील  ‘एम्.बी.बी.एस्.’ विद्यार्थिनींना देहलीत नेण्याचा डाव उघड !

  • सामूहिक धर्मांतराचा प्रयत्न

  • वैद्यकीय क्षेत्रातील ‘लव्ह जिहाद’

  • ‘के.जी.एम्.यू.’मधील बनावट डॉक्टर जिहादी हस्साम अहमद पोलिसांच्या कह्यात !

(के.जी.एम्.यू. – किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी )


लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील ‘किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी’  (के.जी.एम्.यू.) येथे हस्साम अहमद नावाच्या एका मुसलमान तरुणाने स्वतःला  ‘के.जी.एम्.यू.’चा ‘एम्.बी.बी.एस्.’चा उत्तीर्ण विद्यार्थी असल्याचे भासवून बनावट पत्रे आणि नोटिसा यांच्या आधारे ‘के.जी.एम्.यू.’तील हिंदु विद्यार्थिनींना देहलीत नेण्याचा कट रचला होता. त्यांचा सामूहिक धर्मांतराचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ‘के.जी.एम्.यू.’ प्रशासनाने आरोपी जिहाद्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

१. आरोपी हस्साम अहमद हा स्वतः ‘कार्डिओ सेवा संस्थान’चा सहसंस्थापक असल्याचे सांगत होता. तो दीर्घकाळ स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत ‘के.जी.एम्.यू.’ परिसरात वावरत होता. तो बारावीही उत्तीर्ण नसतांना त्याने डॉक्टरांप्रमाणे पेहराव परिधान करून वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला होता.

२. हम्मास याने देहलीतील घंटाघर परिसरात ‘के.जी.एम्.यू.’च्या नावाने एक वैद्यकीय शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ‘के.जी.एम्.यू.’मधील ८ ते १० विद्यार्थिंनीसह इतर संस्थांतील ‘एम्.बी.बी.एस्.’ विद्यार्थीही सहभागी झाले होते. ‘के.जी.एम्.यू.’च्या एका विद्यार्थिनीने ‘के.जी.एम्.यू.’चे प्रवक्ते डॉ. के.के. सिंह यांना या शिबिराविषयी माहिती दिली आणि सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले. संशय आल्याने ते प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणी गेले. तेथे हस्सामच्या दाव्यांची पडताळणी केली असता, तो डॉक्टर नसल्याचे उघड झाले.

संपादकीय भूमिका

देशात ज्या गतीने लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत, त्या पहाता पोलीस नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का ?, असा संशय येतो ! पोलिसांना हे अत्यंत लज्जास्पद !