
टोरोंटो (कॅनडा) – येथील न्यायालयाने भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव याच्या हत्या प्रकरणातील दोषी व्यक्तीस नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. टोरोंटो उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जेन केली यांनी आरोपी रिचर्ड एडविन याला २ स्वतंत्र हत्यांमध्ये दोषी ठरवले. या हत्या त्याने ७ एप्रिल आणि ९ एप्रिल २०२२ या दिवशी केल्या होत्या. या प्रकरणात आरोपीने २१ वर्षीय कार्तिक वासुदेव यांच्यावर गोळीबार केल्याची स्वीकृती दिली होती. बचाव पक्षाने असा युक्तीवाद केला होता की, घटनेच्या वेळी आरोपी ‘सिजोफ्रेनिया’ नावाच्या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि योग्य-अयोग्य यातील भेद ओळखण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याला उत्तरदायी धरू नये; मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.
कार्तिक वासुदेव हा गाझियाबाद येथील रहिवासी होता. तो जानेवारी २०२२ मध्ये उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेला होता; मात्र काही महिन्यांतच त्याची तेथे हत्या झाली होती. कार्तिक याचे वडील जितेश वासुदेव यांनी सांगितले की, ४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर कुटुंबाला अंततः न्याय मिळाला आहे. अंतिम सुनावणीसाठी ते आणि त्यांची पत्नी कॅनडात उपस्थित होते.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !