२० टन ‘चांदी’तून केवळ ६ टन खरी ‘चांदी’ निघाली !
चांदीमध्ये ‘कॅडमियम’ या विषारी धातूची भेसळ झाल्याचे उघड

कटरा (जम्मू) – नुकत्याच झालेल्या एका पडताळणीत येथील श्री वैष्णोदेवी मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या चांदीचा मोठा हिस्सा अस्सल चांदी नसून त्यात स्वस्त धातूंसह विषारी कॅडमियमची भेसळ करण्यात आली असल्याचे उघड झाले.
‘श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डा’ने दानात मिळालेले अनुमाने २० टन धातू वितळवून चांदी काढण्यासाठी सरकारी टाकसाळीत पाठवले होते; परंतु पडताळणीचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक निघाले. चाचणीत असे दिसून आले की, एकूण धातूमध्ये केवळ ५-६ टक्केच खरी चांदी आहे, तर उर्वरित भाग कॅडमियम आणि लोखंड यांसारख्या स्वस्त धातूंचा आहे. म्हणजेच भाविक जी चांदी श्रद्धेने अर्पण करत होते, ती प्रत्यक्षात भेसळयुक्त निघाली.
🚨 ‘Silver’ offered by devotees at Mata Vaishno Devi Temple found to be adulterated
Nearly 20 tonnes of donated “silver” sent for processing reportedly contained only 5–6% real silver.
The remaining composition was largely cadmium and iron, materials that cost a fraction of… pic.twitter.com/kokb8l65IL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 22, 2026
किमतीतील मोठे अंतर
बाजारात चांदीची किंमत २ लाख ५० सहस्र रुपये ते २ लाख ७५ सहस्र रुपये प्रति किलो आहे, तर कॅडमियमची किंमत केवळ ५०० रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. याच कारणामुळे ज्या दानाची किंमत आधी शेकडो कोटी रुपये मानली जात होती, ती आता फारच अल्प झाली आहे. एका उदाहरणात, ७० किलो धातूपासून केवळ ३ किलो शुद्ध चांदी मिळू शकली. इतकेच नाही, तर हा भेसळयुक्त धातू वेगळा करण्यासाठी अधिकार्यांना कित्येक महिने लागले.
आरोग्याला धोका
कॅडमियम हा अत्यंत विषारी धातू आहे. त्याचा वापर प्रामुख्याने औद्योगिक कामांसाठी केला जातो. दैनंदिन उत्पादनांमध्ये याचा वापर करण्यावर ‘भारतीय मानक ब्युरो’ने कठोर नियम लागू केले आहेत. तज्ञांच्या मते, जेव्हा कॅडमियम गरम केले जाते (उदा. धातू वितळवतांना), तेव्हा त्यातून निघणारा धूर फुफ्फुसांना दुखापत करू शकतो, मूत्रपिंडावर परिणाम करू शकतो आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोकाही वाढवू शकतो. याच कारणामुळे टाकसाळीच्या अधिकार्यांनी आधी हा धातू स्वीकारण्यास संकोच व्यक्त केला होता. नंतर विशेष सुरक्षा व्यवस्था आणि उपकरणे यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पर्यावरणावर परिणाम
तज्ञांनी चेतावणी दिली आहे की, कॅडमियम सारख्या धातूची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली नाही, तर तो हवा आणि पाणी दूषित करू शकतो. याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
घटनेमुळे उपस्थित झालेले मोठे प्रश्न !
१. भाविकांना माहिती न देता भेसळयुक्त चांदी विकली जात आहे का ?
२. कटरापासून भवनपर्यंत जी चांदी नाणी, दागिने किंवा भांड्यांच्या स्वरूपात विकली जाते, त्यात भेसळ आहे का ?
३. भाविकांकडूनच स्वस्त (भेसळयुक्त) चांदी अर्पण केली जात आहे का ?
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
हित-अहिताचे ज्ञान : निरोगी मनाची गुरुकिल्ली !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !