
आजच्या डिजिटल युगात जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे, तिथेच सायबर गुन्हेगारीचे सावटही गडद होत आहे. अशा आव्हानात्मक काळात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस आधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या कौशल्याने आणि जिद्दीने सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पोलीस निरीक्षक स्मिता शंकर सुतार करत आहेत. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी प्रबोधनात्मक जनजागृती आणि ठगणार्या गुन्हेगारांवर कारवाई अशा त्यांनी राबवलेल्या प्रभावी कार्यशैलीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधीक्षक बगाटे यांनी प्रशस्तीपत्र देवून कौतुक केले आहे. ऑगस्ट २०२४ पासून सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या स्मिता सुतार यांनी अल्पावधीतच अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून समाजात सुरक्षेची भावना निर्माण केली आहे.
अन्वेषणातील चोख कामगिरी आणि महत्त्वपूर्ण अटक
गेल्या दोन वर्षांत सायबर पोलिसांनी विविध राज्यांतून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. त्यांच्या कार्यकाळातील काही प्रमुख कारवाया खालीलप्रमाणे आहेत:
१. आंतरराज्यीय कारवाया : ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या टोळ्यांचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी थेट हैद्राबाद, राजस्थान आणि गुजरात (राजकोट) पर्यंत जाऊन गुन्हेगारांना अटक केली आहे.
२. डिजिटल अरेस्ट आणि फसवणूक : अलीकडच्या काळात वाढलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीला न जुमानता, बेंगळुरू पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १.२३ लाख रुपयांची फसवणूक करणार्या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात त्यांना यश आले.
३. फेसबुक आणि सामाजिक माध्यमे गुन्हे : जिल्हाधिकार्यांच्या नावे बनावट खाते उघडून लोकांची फसवणूक करणार्या असो किंवा महिलांचे फोटो ‘मॉर्फ’ करून त्यांना त्रास देणार्या विकृत प्रवृत्ती असोत स्मिता सुतार यांच्या पथकाने तांत्रिक अन्वेषणाच्या आधारे अशा गुन्हेगारांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

केवळ कारवाईच नाही, तर जनजागृतीवरही भर
गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांचे कर्तव्य असले, तरी गुन्हे घडूच नयेत यासाठी स्मिता सुतार या विशेष प्रयत्नशील आहेत. ‘प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला’ या उक्तीनुसार त्यांनी विविध स्तरांवर सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले आहे.
१. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण पिढीला ‘इंटरनेट’चा सुरक्षित वापर कसा करावा ? याचे धडे दिले.
२. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित अमली पदार्थ विरोधी मोहीम (DAWN २०२५) आणि भारतीय वैद्यकीय असोसिएशनच्या (WDW) महिला दिन कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
स्मिता शंकर सुतार यांची कारकीर्द ही केवळ गुन्ह्यांच्या अन्वेषणापुरती मर्यादित नसून ते सामाजिक दायित्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेणे आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला सतर्क करणे, अशा दुहेरी भूमिकेतून त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. रत्नागिरीतील सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून त्या बजावत असलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आणि आश्वासक आहे.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !