‘लेन्सकार्ट’चा नवा हिंदुद्वेष उघड

नवी देहली – ‘लेन्सकार्ट’ या चष्म्यांची विक्री करणार्या आस्थापनाने तिच्या हिंदु कर्मचार्यांना धार्मिक प्रतीके वापरण्यावर बंदी घातल्याच्या प्रकरणात क्षमा मागितली असली, तरी आता नवीन प्रकरण समोर आले आहे. सामाजिक माध्यमांत प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये हिंदु संघटनांचे कार्यकर्ते लेन्सकार्टच्या दुकानातील कर्मचार्यांना जाब विचारतांना दिसत आहेत. या व्हिडिओत काही ठिकाणी लहान मंदिरांसारखी व्यवस्था किंवा हिंदूंच्या देवतांची चित्रे पटलाखालील कपाटात लपवून ठेवलेली किंवा कर्मचार्यांच्या पायाजवळ ठेवलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून पुन्हा बहिष्काराच्या मागण्या चालू झाल्या आहेत.
Vigrahas and pictures of Hindu deities kept near the feet of employees in shops#Lenskart's new anti-Hindu hatred revealed.
From this, it is clear that @Lenskart_com's overall mindset is anti-Hindu.
Hindus permanently boycotting such establishments would be the real… https://t.co/4niQqL6YES pic.twitter.com/PYIPdXbNtd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2026
(ही छायाचित्रे /व्हिडिओ देण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते दुकानात प्रवेश करून काऊंटरखालील कपाटात ठेवलेल्या देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांचा शोध घेतात. त्या वेळी एक घाबरलेला कर्मचारी दिसतो आणि कार्यकर्ते त्या देवतांना ‘आदर म्हणून उंच आणि स्पष्ट दिसेल, अशा ठिकाणी ठेवावे’ अशी मागणी करतात. ‘आस्थापनाच्या धोरणात असे काही आहे का ?’, असा प्रश्नही ते विचारतात. काही जणांनी ‘हिंदु देवतांना जाणूनबुजून पायाजवळ आणि नजरेआड ठेवले जात आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘लेन्सकार्ट’च्या इतर शाखांमध्येही अशाच प्रकारचे आरोप समोर आले असून व्यवस्थापकांना अशा वस्तू उघडपणे न ठेवता लपवून ठेवण्याचे निर्देश दिल्याचा दावा सामाजिक माध्यमांवर केला जात आहे. अनेकांनी थेट आस्थापनाचे मालक पियूष बंसल यांना ‘टॅग’ करून ‘तुमच्या नेतृत्वात नेमके काय चालले आहे ?’ असा प्रश्न केला असून हिंदु भागधारक आणि ग्राहक यांनी या आस्थापनाशी असलेल्या नात्यावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या नव्या व्हिडिओंविषयी ‘लेन्सकार्ट’कडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !