
श्री. ऋषिकेश गायकवाड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. श्री. दामोदर गायकवाड आणि सौ. मनीषा गायकवाड (ऋषिकेशचे वडील आणि आई) अन् श्री. आशुतोष गायकवाड (ऋषिकेशचा लहान भाऊ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. व्यवस्थितपणा : ‘ऋषिकेशचे प्रवासाचे किंवा खोलीतील साहित्य व्यवस्थित जागेवर ठेवलेले असते. त्यामुळे त्याला त्याची कुठलीही वस्तू लगेच सापडते.
१ आ. काटकसरी : आम्ही लग्नासाठी कपडे आणि वस्तू खरेदी करत होतो. तेव्हा ‘वस्तू आणि कपडे पुनःपुन्हा घेता येत नाहीत; म्हणून चांगल्या प्रकारचे कपडे आणि वस्तू घेऊया’, असा आमचा विचार होता; मात्र ऋषिकेशने प्रत्येक वस्तू घेतांना ‘त्या वस्तूची किती आवश्यकता आहे ? तिचा वापर किती होईल ?’, यांना महत्त्व देऊन वस्तू घेतल्या.
१ इ. इतरांचा विचार करणे : ऋषिकेश गावी गेल्यानंतर जे काम त्याच्याकडून सहजतेने होऊ शकते, ते काम करायला तो प्राधान्य देतो. तो इतरांशी अनावश्यक बोलणे, अधिक वेळ भ्रमणभाष पहाणे, अशा गोष्टी टाळतो. तो रामनाथी आश्रमात आमच्याकडे आल्यानंतर स्वतःचे कपडे आईला धुण्यासाठी न देता स्वतः धुतो. ‘आपल्यामुळे इतरांच्या सेवेत अडचण नको’, असे त्याला वाटत असते.
१ ई. कुटुंबियांना आधार देणे : त्याला कुठलीही सेवा सांगितली, तर ती पूर्ण होणारच, अशी आम्हाला निश्चिती असते. त्यामुळे तो आम्हा कुटुंबियांचा फार मोठा आधार आहे.
१ उ. प्रेमभाव : मागील ९ वर्षांपासून तो देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहातो. तो आमच्याकडे कधीतरी आल्यानंतर सर्वांशी जवळीक साधतो. तो आम्हाला समजून घेतो.
१ ऊ. सेवेची तळमळ
१. आम्ही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागलो. त्यानंतर ६ मासांनी ऋषिकेश देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेला. आम्ही रामनाथी आश्रमात असल्यामुळे तो कधीतरी आम्हाला भेटायला येतो. तेव्हा तो केवळ आम्हाला भेटण्यासाठी न येता ‘त्या कालावधीत २ – ३ सेवा कशा करता येतील ?’, याचेही नियोजन करतो. तो सेवेचा वेळ वाया घालवत नाही.
२. आम्ही काही वेळा गावाला काही कामानिमित्त जातो. त्या वेळी ‘ऋषिकेशने आमच्या समवेत काही दिवस थांबावे’, असे आम्हाला वाटत असते; मात्र तो गुरुसेवेलाच महत्त्व देतो. ‘माझ्यामुळे एखाद्या साधकाला अडचण नको’, असा त्याचा विचार असतो. आमचे कधी कुठे बाहेर जायचे ठरल्यास ‘ते किती आवश्यक आहे ? आपल्याला देवदर्शन होईल का किंवा नवीन काही शिकता येईल का ?’, अशा गोष्टींचा तो विचार करतो. तो ‘सेवेतील वेळ व्यर्थ जाणार नाही’, याची काळजी घेतो.
३. त्याचे ‘गुरुसेवा अधिकाधिक झोकून देऊन कशी करता येईल ?’, याकडे लक्ष असते. सेवेसाठी स्वतःला त्रास झाला, तरीही तो त्रास सहन करून सेवेला प्राधान्य देतो.’
२. श्री. वाल्मीक भुकन (ऋषिकेशचा लहान मामा), कांचीपुरम्, तमिळनाडू.
२ अ. स्वीकारण्याची वृत्ती : ‘ऋषिकेशला त्याची काही चूक सांगितल्यास तो कधीच उलट बोलत नाही. त्या वेळी तो शांतपणे ऐकून घेतो आणि नंतर त्याचे मत सांगतो.
२ आ. आजोबांचा लाडका असणे : ऋषिकेश सर्वांशी हसून-खेळून रहातो. ऋषिकेशचे आजोबा श्री. महादेव गायकवाड (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८४ वर्षे) यांना ऋषिकेशला भेटल्यावर फार आनंद होतो. ऋषिकेश आजोबांच्या घरी गेल्यावर ते घरातील व्यक्तींना ऋषिकेशच्या आवडीचे अन्नपदार्थ करायला सांगतात.
चि.सौ.कां. वैष्णवी गडकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. कु. स्मिता गडकर (चि.सौ.कां. वैष्णवीची लहान बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. प्रेमळ : ‘वैष्णवी रुग्णाईत साधिकांची काळजी घेते. ती रुग्णाईत साधिकांना काय हवे-नको, ते पहाते.
१ आ. स्वीकारण्याची वृत्ती : तिला एखादी नवीन सेवा सांगितल्यासही ती लगेच स्वीकारते आणि ती सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
१ इ. परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ : ती तिच्या सेवेतील अडचणी उत्तरदायी साधकांना सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेते आणि उत्तरदायी साधकांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करते.
१ ई. सेवाभाव : वैष्णवीला तिच्या सेवेतील चुका सांगितल्यास ती नीट समजून घेते आणि ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी ती प्रयत्न करते.’
‘विवाहसंस्कार’
‘विवाहसंस्कार’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्र सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी |
३. कु. वेदश्री रामेश्वर भुकन (ऋषिकेशची मामेबहीण, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘ऋषिकेशदादाला व्यष्टी साधनेचे पुष्कळ गांभीर्य आहे. तो प्रतिदिन रात्री सारणी लिखाण करूनच झोपतो.’
४. कु. वैभवी झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘त्याच्यात शिकण्याची वृत्ती पुष्कळ आहे. तो एखादी नवीन सेवा मनापासून शिकतो.’
५. श्री. विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘ऋषिकेशकडे आश्रमातील काही सेवांचे दायित्व आहे. तो या सेवा करतांना चांगला अभ्यास करतो आणि निर्णय विचारून घेतो. पू. (सौ.)अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३६ वर्षे) यांना ऋषिकेशने केलेली सेवा आवडते. त्या त्याच्या सेवेचे कौतुक करतात.
आ. त्याने अवजड वाहन चालवणे शिकून घेतले आहे.
इ. तो सर्वांशी त्यांच्या प्रकृतीप्रमाणे जुळवून घेतो.
ई. त्याला आवड-नावड अल्प आहे.’
६. श्री. महेंद्र राठोड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५२ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘ऋषिकेशला सेवेच्या अभ्यासाच्या संदर्भात कोणतेही सूत्र विचारल्यास त्याचे उत्तर तो लवकर देतो.
आ. त्याच्यात नियोजनकौशल्य आहे. तो एखाद्या मोठ्या सेवेचे नियोजन लगेच करतो. त्या सेवेतील बारकावे त्याच्या लवकर लक्षात येतात.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.३.२०२६)

मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
धर्मशास्त्र काय सांगते ?
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान