भारताने हमासला आतंकवादी संघटना घोषित करावे ! – इस्रायल

हमासचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा दावा

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेरुसलेम (इस्रायल) – भारताने हमासला आतंकवादी संघटना घोषित करावे, अशी मागणी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सार यांनी ‘एक्स’द्वारे केली.

गिदोन पुढे म्हणाले की,

हमासचे संबंध भारताने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी आहेत. या संघटनांमध्ये जागतिक स्तरावर परस्पर संबंध असून त्या एकत्रितपणे कार्य करतात. इस्रायलने यापूर्वीच लष्कर-ए-तोयबाला आतंकवादी संघटना घोषित केले आहे. आता भारतानेही हमासचा आतंकवादी संघटनांचा सूचीत समावेश करावा. इस्रायलने इराणच्या नेतृत्वाखाली कार्यरत आतंकवादाचे जाळे मोठ्या प्रमाणात कमकुवत केले आहे. या संघर्षाचा परिणाम आशियामध्येही दिसेल.