हिंदु जनजागृती समितीची शासन आणि प्रशासन यांच्याकडे मागणी

रत्नागिरी, १७ एप्रिल (वार्ता.) – एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा तात्काळ समाविष्ट करावा, या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, सचिव शिक्षण विभाग भारत सरकार यांच्या नावे येथील जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे १७ एप्रिलला देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गोविंद भारद्वाज, गणपत निवळकर, छगनलाल चव्हाण, अरविंद बारस्कर, संजय पावस्कर, संजय जोशी, मंगेश राऊत आणि अमितराज खटावकर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था (एन्.सी.ई.आर्.टी.) ने इयत्ता ८ वीच्या ‘हमारे अतीत’ या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळल्याचे निदर्शनास आले आहे. ही कृती केवळ शैक्षणिक चूक नसून ती भारताच्या वैभवशाली इतिहासाचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ प्रादेशिक सत्ता नव्हती, तर ती आक्रमक परकीय शक्तींविरुद्ध उभारलेली एक सांस्कृतिक आणि नैतिक क्रांती होती. हा नकाशा वगळण्याचा निर्णय घेणार्या दायित्वशून्य अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे जर एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमध्ये आजही अनेक ठिकाणी मोगल आक्रमकांना महान ठरवले गेले असेल, तर केवळ हा नकाशाच नव्हे, तर संपूर्ण पाठ्यपुस्तकांचे तज्ञांकडून पुनरावलोकन करण्यात यावे. जर इतरही महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ, किल्ले किंवा क्रांतीकारकांची माहिती वगळली असेल, तर ती त्वरित समाविष्ट करण्यात यावी.
२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !