२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग !

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) – हिंदु संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन आणि समर्थ भारताच्या निर्मितीसाठी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने हरणेश्वर वस्ती भागात आयोजित करण्यात आलेले ‘विशाल हिंदु संमेलन’ उत्साहात पार पडले. या संमेलनाला तळेगाव शहर आणि परिसरातील २ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती. धर्मजागरण संयोजक (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) श्री. राजेश पुलैया, ‘विराट हिंदु संमेलन हरणेश्वर वस्ती’चे संयोजक श्री. योगेश दळवी, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी मातृशक्तीला मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांवरील वाढते अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटांना तोंड देण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता विशद केली.
मुख्य वक्ते म्हणून उपस्थित असलेले श्री. राजेश पुलैया यांनी उपस्थितांना सांगितले, ‘‘आजच्या काळात हिंदु समाजाने जात-पात विसरून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. समर्थ भारत घडवण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरणी होणे आवश्यक आहे.’’
संमेलनाच्या सांस्कृतिक भागात हरणेश्वर वस्तीतील शिवभक्तांनी ‘जाणता राजा’ या महानाट्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील निवडक प्रसंगांवर आधारित भव्य ‘शिवदर्शन’ हा नाट्यप्रयोग सादर केला. यामुळे उपस्थितांमध्ये वीरश्री जागृत झाली.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !