१२ एप्रिल या दिवशी झाला दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा

हिंदूंचे वैचारिक रक्षण करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरापर्यंत पोचले पाहिजे ! – सद्गुरु सत्यवान कदम

सनातन हिंदु धर्माच्या विचारांचे अधिष्ठान ठेवून गेली २७ वर्षे अविरतपणे ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. कोणतेही राजकीय पाठबळ नसतांना आणि हिंदू विरोधकांच्या विरोधाला पुरून ऊरून पावणेतीन दशके हिंदुत्वाच्या विचारांचे दैनिक चालवणे ही सोपी गोष्ट नाही. आज देशात हिंदुत्वाचे वारे वहात असल्याचे चित्र दिसते; परंतु जेव्हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणे हा अपराध मानला जात होता, तेव्हाही ‘सनातन प्रभात’ने निर्भीडपणे हिंदुत्वाची बाजू मांडली. प्रतिकूल परिस्थितीत झुंज देणारा तो खरा योद्धा असतो, त्या अर्थाने ‘सनातन प्रभात’ हे केवळ एक वर्तमानपत्र नसून तो एक ‘वैचारिक योद्धा’ आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय बाळगणार्या संघटनांना वैचारिक बळ देण्याचे आणि हा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य हे दैनिक करत आहे. लव्ह जिहाद, हलाल सक्ती, जिहादी आतंकवाद, इतिहासाचे विकृतीकरण आणि देवतांचे विडंबन यांसारख्या विषयांवर या दैनिकाने एका ऋषीप्रमाणे जागृती केली आहे. आज जो देवतांच्या विडंबनाच्या विरोधात आवाज उठवतांना दिसतो, त्याचे बीज ‘सनातन प्रभात’ने लावलेल्या विचारांतच आहे.
‘सनातन संस्था’ आणि ‘सनातन प्रभात’ यांचे कार्य कुरुक्षेत्रातील भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आहे ! – अधिवक्ता समीर गव्हाणकर

‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ यांचे कार्य हे कुरुक्षेत्रातील भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आहे. कुरुक्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने जसे विविध ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) दूर करण्याचे कार्य केले होते, तसेच आजही धर्माविषयी समाजात निर्माण झालेले खोटे कथानक नष्ट करून ‘सनातन प्रभात’ सत्य मांडत आहे. या नॅरेटिव्हच्या माध्यमातून भ्रमिष्ट झालेल्या समाजाला बाहेर काढण्याचे कार्य गेली २७ वर्षे अव्याहतपणे ‘सनातन प्रभात’ करत आहे. गेली कित्येक वर्षे ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, तसेच हलाल सर्टिफिकेट आदी विषय प्रथम ‘सनातन प्रभात’ने मांडले. धर्मविरोधी शिक्षण कोणते आणि ते कुठे दिले जाते ? हे प्रथम ‘सनातन प्रभात’ने उघड केले. आपली ही हिंदु भूमी सुरक्षित ठेवायची असेल, तर खोटे कथानक हाणून पाडले पाहिजे. भारत ही पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीचे तुकडे न होण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. ज्या अहिंसेचा बोलबाला केला जातो, त्याने काश्मीरचा प्रश्न असो अथवा नक्षलवादाचा विषय असो, हे प्रश्न सोडवले आहेत का ? हिंदु आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात केल्या जाणार्या षड्यंत्रांना बळी पडू नका.
परमेश्वराला अभिप्रेत असे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वेदमूर्ती भूषण जोशी

परमेश्वराला अभिप्रेत असणारे कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ जवळपास आता २७ वर्षे करत आहे. आपला धर्म, आपले आचार, विचार, संस्कृती यांविषयी आणि एकंदरीत भारतातील उजव्या विचारसरणीला प्राधान्य देणारा असा नियतकालिकांचा समूह केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’ आहे. आज अनेक भाषांमध्ये, अनेक भागांमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य पसरलेले आहे.
सद्य:स्थितीत हिंदु धर्माच्या विरोधात पसरवल्या जाणार्या विविध गोष्टींची चिरफाड करून ‘सनातन प्रभात’ने सत्य समोर आणले आहे. पाखंडांचे खंडन करणारे अनेक तज्ञांचे लेख या दैनिकातून प्रसिद्ध केले जातात. दैनिक ‘सनातन प्रभात’वर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. दैनिक ‘सनातन प्रभात’ जसे सांगत आहे, तसे आचरण करा.
देशाला नैतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानाची आवश्यकता ! – राजेंद्र पाटील

आज देशाला केवळ भौतिक विकासाची नाही, तर नैतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या ‘रामराज्या’ची म्हणजेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व विधी धर्माच्या अनुषंगाने होतात, तरीही हिंदूंना शाळा किंवा मंदिरात धर्मशिक्षण मिळत नाही, ही शोकांतिका आहे. धर्माचरण केल्याविना जीवन आनंदी होऊ शकत नाही. जगभरात अनेक पंथांची राष्ट्रे आहेत; मात्र बहुसंख्यांक असूनही हिंदूंचे एकही स्वतंत्र राष्ट्र नाही. मुलींचे होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा वाढता पगडा पहाता छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आदर्श मुलांसमोर ठेवणे आवश्यक आहे. स्वदेशीचा वापर करणे, हे प्रत्येक हिंदूचे राष्ट्रकर्तव्य आहे. ‘सनातन प्रभात’मधील विचार केवळ वाचून सोडून न देता ते प्रत्यक्ष कृतीत आणून प्रत्येक हिंदूने सात्त्विक बनावे आणि राष्ट्रकार्यात खारीचा वाटा उचलावा.
‘सुराज्य अिभयाना’च्या अंतर्गत कार्य करण्याची हिंदुत्वनिष्ठांची सिद्धता
या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले कार्य आणि त्याला मिळालेले यश यांविषयी अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. रविकांत नारकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सामाजिक कार्य करणार्या ४ व्यक्तींनी त्यांच्या भागातील समस्यांविषयी डॉ. नारकर यांना सांगितले आणि ‘सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्हीही पुढे कार्य करू इच्छितो; कारण ‘सुराज्य अभियाना’चे कार्य ऐकून आम्हाला आपल्याविषयी विश्वास निर्माण झाला’, असे या व्यक्तींनी सांगितले.
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई