‘२४.३.२०२५ या दिवशी सकाळी मी अमरावती सेवाकेंद्राच्या परिसरातील तुळशी वृंदावनासमोर रांगोळीने ‘श्रीराम समर्थ ।’, असे लिहिलेले पाहिले आणि मला पुढील काव्यात्मक कृतज्ञता स्फुरली.

माझ्यासारख्या जिवाला ।
योग्य कुळात जन्म देणारा माझा श्रीराम समर्थ ।।
मला साधना शिकवून ।
ती करून घेणारा माझा श्रीराम समर्थ ।। १ ।।

माझ्या मनात येणारे संकल्प ।
सिद्धीस नेण्यास माझा श्रीराम समर्थ ।।
मनातील विकल्पांवर मात करण्या ।
योग्य मार्गदर्शन करणारा श्रीराम समर्थ ।। २ ।।
अनेक जन्मांतील स्वभावदोष घालवून ।
गुणवृद्धी करून घेण्यास माझा श्रीराम समर्थ ।।
मला अखंड सेवा देऊन ।
ती माझ्याकडून कौशल्याने करून घेण्यास माझा श्रीराम समर्थ ।। ३ ।।
मला भूतकाळ विसरायला शिकवून ।
भविष्याच्या चिंता दूर करून
वर्तमानात ठेवण्यास माझा श्रीराम समर्थ ।।
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ।
योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून देण्यास श्रीराम समर्थ ।। ४ ।।
मनातील प्रत्येक विचारावर ।
नियंत्रण मिळवून देण्यास माझा श्रीराम समर्थ ।।
‘मी-माझे’, हे कर्तेपण घालवण्याची ।
सतत जाणीव करून देणारा माझा श्रीराम समर्थ ।। ५ ।।
माझा श्वास, माझा विश्वास अन् माझे अस्तित्व ।
टिकवून ठेवणारा माझा श्रीराम समर्थ ।।
प्रत्येक जिवावर निरपेक्ष प्रेम करायला शिकवणारा ।
माझा श्रीराम समर्थ ।। ६ ।।
या जन्मातच माझी साधना पूर्ण करून घेण्यासाठी ।
स्वतः धडपडणारा माझा श्रीराम समर्थ ।।
मी केवळ आणि केवळ कृतज्ञ असायला हवे ।
याची जाणीव करून देणाराही माझा श्रीराम समर्थ ।। ७ ।।
– सौ. माया पिसोळकर, अमरावती (२४.३.२०२६)
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
उतारवयात आश्रमजीवन सहजतेने स्वीकारणार्या आणि गुरुदेवांप्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा शरदचंद्र सामंतआजी (वय ८९ वर्षे) !