कामगार आयुक्तालयाचे उपायुक्त निखिल वाळके यांनी दिली माहिती

पुणे – नाशिक येथील माहिती तंत्रज्ञान आस्थापनातील महिला कर्मचार्यांवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले. याच धर्तीवर ‘कामगार आयुक्तालया’ने आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांची पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आस्थापनातील महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक समित्या, तक्रारी आणि त्यावरील कार्यवाही यांचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी दिली.
१. पुण्यातील आस्थापनांच्या कार्यालयांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत, यासाठी अंतर्गत समित्या आहेत का ? याची पडताळणी केली जाईल.
२. समित्यांकडून महिला कर्मचार्यांच्या तक्रारींवर काय कार्यवाही केली गेली ? कोणत्या उपाययोजना काढल्या ? याची चौकशी केली जाईल.

३. या पडताळणीमध्ये नियमांचा भंग केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
४. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम २०१३’नुसार १० किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी अन् कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असते.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !