Gleeden App : भारतामध्ये ‘ग्लीडन’ या विवाहबाह्य संबंधांसाठीच्या ॲपचे ४० लाख वापरकर्ते

नवी देहली – भारतामध्ये ‘ग्लीडन’ या विवाहबाह्य संबंधांसाठी वापरल्या जाणार्‍या ॲपचे वापरकर्ते ४० लाखांवर पोचले आहेत. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये वापरकर्ते अधिक असल्याचे दिसून आले. बेंगळुरू येथे १८ टक्के, भाग्यनगर १७ टक्के, देहली ११ टक्के ही काही उदाहरणे आहेत. वापरकर्त्यांमध्ये ६५ टक्के पुरुष, तर ३५ टक्के महिला आहेत. बहुतांश वापरकर्ते आधीच विवाहित किंवा दीर्घकालीन नात्यात आहेत.

महिलांचा वाढता सहभाग

गेल्या २ वर्षांत महिलांच्या वापरामध्ये १४८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सरासरी भारतीय वापरकर्ता प्रतिदिन १ ते दीड घंटे या ॲपवर संवाद साधतो. या वाढत्या वापरामुळे समाजातील वैवाहिक मूल्यांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतियांमधील नैतिकतेचे अधःपतन किती वेगाने होत आहे, याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय ! ही स्थिती पुढे भारताला पाश्चात्त्य देशांप्रमाणे संस्कारहीन करणारी आहे, हे वेगळे सागायला नको !