‘१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. या लेखात महोत्सवातील दुसर्या दिवशी दुपारी आणि सायंकाळी झालेल्या सत्रांचे सूक्ष्म परीक्षण दिले आहे.

१. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या विशेष सत्रात राज्यसभा सदस्य आणि भाजपचे प्रखर राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी धर्मज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या ज्ञानामृताचा वर्षाव करणे

श्री. सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितले, ‘‘हिंदु धर्मामध्ये वैदिक गणित आणि आयुर्वेद समाविष्ट आहे. असे अन्य कोणत्याही पंथात आढळत नाही. हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.’’ ‘आपल्या हिंदु धर्मात जीवात्मा आणि ईश्वर यांच्यामध्ये अभेद अन् अद्वैत असल्याचा सिद्धांत, तसेच पुनर्जन्माची संकल्पना आहे’, हे त्यांनी हिंदूंच्या धर्मग्रंथांतील दाखले देत विशद केले. ते बोलत असतांना कार्यक्रमस्थळी ज्ञानसूर्य तळपत होता आणि त्याचे दिव्य ज्ञानतेज माननीय सुधांशु त्रिवेदी यांच्या माध्यमातून प्रगट होत होते. त्यामुळे त्यांचे ओजस्वी भाषण सर्व धर्मप्रेमी मंत्रमुग्ध आणि प्रभावित होऊन ऐकत होते. त्यांनी सांगितले, ‘‘भारतियांमध्ये स्वतःचे ज्ञान, समृद्धी आणि शौर्य यांची जागृती करायला हवी.’’ त्यांचे हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे असून ‘असे झाले, तरच भारत पुन्हा एकदा विश्वगुरुपदी विराजमान होईल’, असे मला जाणवले. त्यामुळे हिंदूंना विविध प्रकारे जागृत करण्याचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘श्री. सुधांशु त्रिवेदी साक्षात् सरस्वतीमातेचे सुपुत्र असून ते परम विद्वान आहेत. ते आपल्या वाणीतून हिंदु धर्माच्या ज्ञानतेजाचे प्रक्षेपण संपूर्ण विश्वात करून सर्वांना या ज्ञानतेजाने दिपून टाकत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या बोलण्याने हिंदु धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यामध्ये धर्माप्रतीचा भाव जागृत होऊन धर्माभिमान वृद्धींगत होत होता आणि त्यांना आनंदाची अनुभूती येत होती.
२. सनातन राष्ट्र संकल्प संतसभा
यात मान्यवर आणि संत यांनी त्यांचे तेजस्वी विचार प्रगट केले.

२ अ. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी हिंदु राष्ट्र चिंतनाविषयी मार्गदर्शन करणे : श्री. रमेश शिंदे यांना जगद्गुरु श्रीकृष्णाचे विशेष कृपाशीर्वाद प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी धर्मजागृती करणार्या अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना हिंदु धर्माचे सखोल ज्ञान असून ते मोठे विचारवंत आणि विद्वान आहेत. त्यांचे भाषण धर्मज्ञानाने परिपूर्ण असते. ते समस्त हिंदूंमध्ये जागृती करून ‘धर्माचरण, धर्मरक्षण आणि धर्मसंस्थापना’ हे विषय बुद्धीला उमजतील अन् पटतील, अशा सोप्या शब्दांत आणि प्रभावशाली शैलीत मांडतात. त्यामुळे त्यांचे भाषण सर्वसामान्य, तसेच बुद्धीवादी हिंदू यांना ‘धर्माचरण, धर्मरक्षण आणि धर्मसंस्थापना’ करण्याच्या दैवी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणादायी ठरते. त्यांनी ‘सेक्युलॅरिझम’चे (निधर्मीवादाचे) खरे आणि हिंदूंचे दमन अन् हानी करणारे’ विकृत स्वरूप सर्वांसमोर प्रस्तुत करून हिंदूंच्या मनावरील ‘सेक्युलॅरिझम’चा भ्रम दूर केला. यातून ‘त्यांच्यात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या संगमासह जाज्वल्य धर्मतेजही कार्यरत आहे’, हे लक्षात येते. त्यामुळे ते गांभीर्य निर्माण करणारा विषयही सहजरित्या मांडतात.
२ आ. ‘पावन चिंतनधारा आश्रमा’चे संस्थापक पू. पवन सिन्हागुरुजी यांनी ‘सनातन राष्ट्र आणि युवा जागरण’ यांविषयी सात्त्विक वाणीत प्रबोधन करणे : पू. पवन सिन्हागुरुजी यांनी ‘युवकांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात चांगल्या चारित्र्याची निर्मिती आणि सुचारित्र्याचे बळ जागृत करायला हवे’, याविषयी प्रबोधन केले. ते सात्त्विक असल्यामुळे त्यांची वाणी अतिशय मृदू असूनही त्यांचे विचार अत्यंत परखड आहेत. हे पुष्कळ स्तुत्य आहे.
२ इ. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘भावी आपत्काळ आणि संरक्षणाचे उपाय’ यांविषयी चैतन्यमय वाणीत सर्वांना दिशादर्शन करणे : सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी समस्त धर्मपे्रमी हिंदुत्वनिष्ठांना ‘जागतिक स्तरावर विविध राष्ट्रांमध्ये चालू असलेल्या युद्धाची उदाहरणे आणि नैसर्गिक आपत्ती’, यांविषयी, तसेच ‘भविष्यवेत्ता अन् संत यांनी भविष्यातील आपत्काळाविषयी केलेले भविष्यकथन’ यांची उदाहरणे सांगून त्यांच्यामध्ये गांभीर्य निर्माण केले. त्याचप्रमाणे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर करायच्या उपाययोजना’ यांविषयी सांगून समस्त हिंदूंना आश्वस्त केले. त्यांनी धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना ‘भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीतून तरून जाण्यासाठी धर्माचरण अन् साधना करणे आवश्यक आहे’, हे आपल्या चैतन्यमय पश्यंती वाणीतून सांगितले. त्यांनी ‘अंधःकारमय आपत्काळाच्या नंतर ज्ञानाच्या प्रकाशमय सूर्याचा उदय होणार, हे निश्चित आहे’, असे अनमोल मार्गदर्शन केले. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून सप्तर्षींमध्ये प्रमुख असणार्या आणि नक्षत्रलोकात वास करणार्या कश्यप ऋषींनी मार्गदर्शन केल्याचे जाणवले. यावरून सद्गुरु नीलेशदादांच्या माध्यमातून सप्तर्षी संपूर्ण विश्वात हिंदु धर्माचे तेज आणि ज्ञान यांचा प्रसार करत असल्याचे जाणवले. त्यामुळे सद्गुरु नीलेशदादांचे मार्गदर्शन ऐकत असतांना माझे मन शांत आणि स्थिर झाले, तसेच माझ्या मनाची एकाग्रता वाढली. यातून ‘संत आणि सद्गुरु यांनी केलेल्या चैतन्यदायी मार्गदर्शनाचा परिणाम थेट चित्तापर्यंत होतो’, हे अनुभवता आले.
२ ई. ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय सूचना आयुक्त उदय माहुरकर यांचे अत्यंत प्रेरणादायी अन् हिंदु राष्ट्राविषयी दिशादर्शन करणारे प्रभावी मार्गदर्शन : श्री. उदय माहुरकर यांच्यामध्ये ‘स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा, वक्तृत्वकला, सात्त्विकता आणि धर्मपरायणता’ हे गुण प्रकर्षाने जाणवतात. त्यांनी सनातन संस्थेचे कौतुक करून ‘अशी सात्त्विक संस्थाच धर्मराज्याची निर्मिती करू शकते’, या विचाराचे समर्थन करून सनातन संस्थेला मुक्तपणे पाठिंबा दर्शवला.
३. ‘धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, या संकल्पाने भारलेले धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठ आपापल्या राज्यात (प्रांतात) जाऊन प्रभावीपणे धर्मकार्य करून तेथे भगवा ध्वज फडकवणार असणे !
श्री. कार्तिक साळुंखे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य करणार्या ज्ञात आणि अज्ञात लोकांचे मनःपूर्वक आभार मानून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर ‘वन्दे मातरम्’चे समूहगान करून महोत्सवाची सांगता करण्यात आली. तेव्हा कार्यक्रम स्थळातील वातावरण ‘अपार देशभक्ती आणि जाज्वल्य धर्माभिमान’ यांनी भारित झाले होते. सर्वांची मने केवळ ‘धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, या संकल्पाने भारली होती. ‘याच प्रेरणादायी विचारांचा ठेवा आणि संकल्पशक्ती घेऊन हे धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठ आपापल्या प्रांतात जाऊन प्रभावीपणे धर्मकार्य करणार आहेत आणि तेथे भगवा ध्वज फडकवणार आहेत’, यात तीळमात्रही शंका नाही !
‘सनातन जय सनातन जय सनातन धर्म महान !
कृतज्ञता : ‘या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा भगवंताने माझ्याकडून करून घेतल्याबद्दल मी भगवंताच्या चरणी भावसुमने अर्पण करते.’
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.१२.२०२५, वेळ : दुपारी २.३० ते ४.३० आणि दुपारी ५.३० ते रात्री ८.३५ आणि एकूण कालावधी ५ घंटे ५ मिनिटे)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !