
मिरज – येथील ब्राह्मणपुरीमधील सनातन आश्रमाला आळंदी देवाची येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता सदिच्छा भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई यांनी त्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या चालू असलेल्या ‘राष्ट्र आणि धर्म’ कार्याची सविस्तर माहिती दिली, तसेच त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव-संकल्प रामराज्याचा’ हा ग्रंथ भेट दिला. या वेळी ह.भ.प. धनंजय दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री द्वारकाधीश मुदडा, सनातनच्या साधिका श्रीमती मधुरा तोफखाने, डॉ. (कु.) शिल्पा बर्गे, साधक श्री. योगेश जोशी आदी उपस्थित होते.
‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती’चे विश्वस्त योगी निरंजन नाथ गुरु शांतीनाथ पुढे म्हणाले की, समुद्रमंथनानंतर देवांना देवत्व प्राप्त झाले; परंतु त्यासाठी महादेवांना विषप्राशन करावे लागले. यातूनच सन्मार्गावर चालणे, साधना करणे आणि संघटन बांधणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवणे यांसाठी अपार कष्ट घ्यावे लागते अन् त्याग करावा लागतो, हे आपल्याला शिकायला मिळते. आपण मूर्तीपूजा करतो, याचाच अर्थ आपण दगडातही देव पहातो. हीच आपल्या संस्कृतीची महानता आहे. ही नित्यनूतन सनातन संस्कृतीच भारताची खरी शक्ती आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !