
१. शास्त्राच्या विपरित वर्तणूक ही वाईट परिणामांना कारणीभूत ठरते, तर शास्त्रातील मार्गदर्शनाप्रमाणे केलेली कृत्ये आणि कर्मे चांगली फळे देतात.
२. आपली सर्व धार्मिक कृत्ये, कर्मे आणि व्यवहार यांत हे धार्मिक ग्रंथच उत्तम श्रेष्ठ मार्गदर्शक ठरतात. कोणत्याही कारणाने त्यात पालट करण्याचा कुणालाच अधिकार नाही.
३. या ग्रंथ वाङ्मयात न्यूनता शोधणे, पालट करण्याची आवश्यकता आणि अधिकार कुणालाच नाही. केवळ या ग्रंथातील आज्ञापालन न करणे किंवा अयोग्य प्रकारे अर्थ लावून व्यवहार करणे, हेच विपरीत फळे किंवा त्रासाचे कारण होऊ शकते. म्हणून पुनः व्यवहार त्यातील मार्गदर्शनानुसार करा, म्हणजे सर्व मार्गावर येईल.
४. ज्या वेळेस या आज्ञांप्रमाणे लोक वागत होते, त्यातील नियमांचे पालन करून धार्मिक कर्तव्ये, कर्मे करत होते, तेव्हा ते आनंदी, सुखी होते. जेव्हा ते त्याकडे दुर्लक्ष करून त्यावर स्वतःचा प्रभाव टाकून अंधश्रद्धेने आणि आध्यात्मिक कर्तव्याकडे दुर्लक्ष करू लागले, तेव्हा ते त्रास, कष्ट, समस्यांचे, दुःखाचे कारण ठरले. श्रद्धा आणि योग्य आचरण, हे आनंदाचे कारण बनते. तसे वागण्याने आणि कार्यवाहीत आणण्याने पुनश्च आनंद निर्मिती होईल.
५. आपल्या सर्वच पुरातन शास्त्रांत आपल्या प्रत्येक कृती करण्याच्या क्षमतेचा आणि शक्यतेचा विचार विश्लेषण करून नंतरच तो संबंधितास उपयुक्त कसा होईल, त्यासंबंधी विधी आणि मार्गदर्शन केलेले आहे.
६. आपल्या या पुरातन ग्रंथशास्त्रांचे पूर्वजांनी महत्त्व जाणले होते. आपणही आपल्या मुलांना त्याचे महत्त्व पटवून द्या, त्याचे शिक्षण देऊन त्यात वर्णन केलेले नित्य वैदिक विधी आणि कार्य करण्यास त्यांना प्रवृत्त करा. त्यांना त्याचे योग्य ज्ञान देऊन आणि आपल्या पुरातन आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व सांगून त्यांचे संरक्षण करा.
– श्री.एम्.एस्.एम्. शर्मा
(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?