जबलपूर (मध्यप्रदेश) – एखाद्या मुसलमान पुरुषाचे पहिले लग्न वैध असतांनाही त्याने दुसरे लग्न केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ अंतर्गत द्विविवाहाचा गुन्हा लागू होत नाही. कलम ४९४ तेव्हाच लागू होते, जेव्हा पहिल्या लग्नाच्या अस्तित्वात दुसरे लग्न कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरते; मात्र ‘मुस्लिम वैयक्तिक कायद्या’नुसार पुरुषाला बहुपत्नीत्वाची अनुमती असल्याने दुसरे लग्न आपोआप अवैध ठरत नाही. त्यामुळे या कलमाखाली गुन्हा नोंद करता येत नाही, असा निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दिला.
या प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका स्वीकारली आणि त्याच्यावरील द्विविवाहाचा आरोप पूर्णपणे रहित केला; मात्र भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ (पत्नीवर अत्याचार), ३४२ (बेकायदेशीर कैद), ३२३ (जखम करणे) आणि ५०६ (भाग २) (धमकी) अंतर्गत नोंदवलेले इतर गुन्हे कायम ठेवले. या प्रकरणाची सुनावणी कनिष्ठ न्यायालयात चालू रहाणार आहे.
काय आहे प्रकरण ?
याचिकाकर्त्याच्या पत्नीने आरोप केला होता की, वर्ष २००२ मध्ये विवाह झाल्यानंतर मुलबाळ न झाल्याच्या कारणावरून पतीने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. तसेच वर्ष २०२२ मध्ये तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि तिच्यावर ‘खुला’द्वारे (मुसलमान महिलांकडून देण्यात येणारा तलाक) घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला.

अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती