मद्रास उच्च न्यायालयच्या मदुराई खंडपिठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने वर्ष २०२० मध्ये सथानकुलम् कोठडी मृत्यू प्रकरणात दोषी ठरलेल्या तामिळनाडूतील ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या घटनेला अत्यंत दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानत ही कठोर शिक्षा दिली आहे.
🚨 Sathankulam Custodial Deaths Case
In a landmark verdict, Madurai Court sentences 9 policemen to death for the brutal torture & killing of father-son duo Jayaraj & Bennix (2020 lockdown).
🏥 Shockingly A Govt hospital doctor had cleared them “fit for remand” despite injuries… pic.twitter.com/2tJzi4GczH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 8, 2026
१. हा निर्णय ६ वर्षे चाललेल्या दीर्घ सुनावणीनंतर देण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. मुथुकुमारन् यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने सर्व ९ आरोपींना हत्या आणि इतर संबंधित कलमांखाली दोषी ठरवले. या निर्णयात न्यायालयाने नमूद केले की, हा प्रकार अत्यंत क्रूर आणि सत्तेच्या अपवापराचे उदाहरण आहे.
२. केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अन्वेषणात पोलिसांनी केलेला अत्याचार पूर्वनियोजित होता आणि तो रात्रभर चालला होता, असे निष्पन्न झाले. अन्वेषण विभागाने न्यायालयात युक्तीवाद केला की, आरोपींनी जाणीवपूर्वक असे अमानुष कृत्य केले. त्यामुळे त्यांना कमाल शिक्षा दिली जावी. न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य केला.
दोषी पोलिसांची नावे
१. एस्. श्रीधर, पोलीस निरीक्षक
२. पी. रघु गणेश, उपनिरीक्षक
३. के. बालकृष्णन्, उपनिरीक्षक
४. एस्. मुरुगन, मुख्य हवालदार
५. ए. समदुरई, मुख्य हवालदार
६. एम्. मुथुराज, पोलीस शिपाई
७. एस्. चेल्लादुरई, पोलीस शिपाई
८. एक्स. थॉमस फ्रान्सिस, पोलीस शिपाई
९. एस्. वेलुमुथू, पोलीस शिपाई
या प्रकरणातील दहावा आरोपी विशेष उपनिरीक्षक पॉलदुरई याचा खटल्याच्या वेळी कोरानामुळे मृत्यू झाला.

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !