गेल्या वर्षी कर्णावती येथे झालेल्या विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे पंतप्रधानांना पत्र

कर्णावती (गुजरात) – आम्हाला पैसे नको आहेत. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, अपघात का झाला आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का? जर ‘ब्लॅक बॉक्स’ आणि ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ यांमधील डेटा सार्वजनिक केला जाऊ शकत नसेल, तर किमान तो खासगीरित्या कुटुंबांसमवेत सामायिक केला जावा, अशी मागणी १२ जून २०२५ या दिवशी कर्णावती येथे झालेल्या विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी पतंप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. ३० पीडित कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पीडित कुटुंबांनी पत्राची प्रत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाही पाठवली आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने गेल्या वर्षी जुलैमध्ये विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल यावर्षी जूनमध्ये, म्हणजेच अपघाताच्या पहिल्या वर्षपूर्तीजवळ येण्याची शक्यता आहे.
कर्णावती येथून लंडनला जाणारे बोइंग ७८७ हे विमान उड्डाणानंतर लगेचच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले होते. या अपघातात २४१ प्रवासी आणि इतर १९ लोकांसह एकूण १६० लोकांचा मृत्यू झाला होता. यात ६० परदेशी नागरिकही होते.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’