मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मदरशांना टाळे ठोकावे ! – T Raja Singh

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन

आमदार टी. राजा सिंह (डावीकडे) व मंत्री नितेश राणे (उजवीकडे)

नांदेड – महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी मदरशांविषयी केलेल्या विधानाला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सर्वच मदरसे बंद करा. या मदरशांत देशविघातक शिक्षण दिले जाते. नीतेश राणे यांना माझे निवेदन आहे की, त्यांनी हे अनधिकृत मदरसे बंद करण्याऐवजी त्यांना टाळे ठोकावे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब यांसारखे आतंकवादी अशाच मदरशांतून निर्माण झाले आहेत. त्यामुळे नीतेश राणे यांनी त्यांचे बोल खरे करून दाखवावेत, असे आवाहन भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी येथे केले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर हटवून तिथे शौचालय बांधावे !

टी. राजा सिंह पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटत आहे का ? औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यानंतर मुसलमानांची मते मिळणार नाहीत, अशी भीती वाटते का ? पण ते (मुसलमान) तुम्हाला मतदान करणारच नाहीत, हे लिहून घ्या.  महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको. त्याने आमच्या छत्रपती संभाजीराजांना हाल हाल करून मारले. त्यामुळे त्याची कबर हटवण्यासाठी मावळे हवे असतील, तर आम्ही लाखोंच्या संख्येने येऊ.

देशद्रेह्यांना गोळ्या घालण्यासाठी घरोघरी बंदुका असाव्यात !

आमदार टी राजा सिंह यांनी हिंदूंना आवाहन केले की, हिंदूंनी घरात स्वसंरक्षणाची शस्त्र ठेवले पाहिजे. देवाच्या गाभार्‍यात शस्त्र ठेवणे कायदेशीर आहे; पण ते बाहेर काढून स्वसंरक्षणाची प्रतिकार केला, तर विषय वेगळा आहे. भविष्यात युद्ध झाले आणि शस्त्र नसतील, तर तुम्ही काय करणार ? कसे लढणार ? देशद्रोही आक्रमण करण्यासाठी आले, तर आत्मरक्षणासाठी आपण सज्ज असले पाहिजे.