‘शास्त्र’ सदर : प्राचीन शास्त्र, सोप्या भाषेत

१. भगवान शिवाला प्रिय असलेली पुष्पे
‘पांढरी रुई, कण्हेर, धोतरा, शमीचे फूल, द्रोणपुष्प (तुंबा, शास्त्रीय नाव – Leucas aspera), निळे कमळ, ही फुले शिवाला उत्तरोत्तर सहस्रगुण (सहस्र पटींनी) प्रिय आहेत, म्हणजे पांढर्या रुईपेक्षा सहस्रगुण कण्हेर प्रिय आणि याप्रमाणे पुढे चाफा, जास्वंद, आंबा आणि करडई यांची फुलेसुद्धा शिवाला प्रिय आहेत.

२. भगवान शिवाला प्रिय असलेले पान

शिवपूजेत बेलाचे पान अनिवार्य आहे. स्वतः शंकराने पुराणांत सांगितले आहे, ‘‘हे पार्वती, बिल्वपत्रांऐवजी हिरे, मोती, रत्ने यांनी जरी माझी पूजा केली, तरी मी त्या पूजेचा स्वीकार करत नाही. बिल्वपत्र हे दारिद्र्याचा नाश करणारे आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे.’’
शिवाला बेलाची पाने अर्पण करतांना ती पालथी ठेवावीत आणि त्यांचा देठ देवाकडे अन् अग्र पूजकाकडे, अशी दिशा असावी.
३. अन्य सूत्रे
अ. जो भक्त एक सहस्र निळ्या कमळांची माळ शिवाला अर्पण करतो, तो सहस्रो वर्षांपर्यंत शिवलोकात निवास करतो.
आ. धोतर्याच्या फुलांनी शिवपूजा केल्यास १ लक्ष गोदानाचे फळ मिळते.
इ. उत्तम प्रकारे पिकलेला आंबा शिवाला अर्पण केल्यास पूजकाला १० सहस्र वर्षांपर्यंत शिवलोकात स्थान मिळते.’
(संदर्भ : धर्मसिंधु)
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (९.३.२०२६)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !