केंजारू (कर्नाटक) : मंदिराच्या दानपेटीतील २५ सहस्र रुपये चोरणार्‍या शबीकला अटक !

शबीक

मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या केंजारू गावातील श्री रामांजनेय मंदिरात नुकतीच चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी शबीक अहमद शेख याला अटक केली आहे. शबीकने मंदिराचे द्वार तोडून ३ दानपेट्यांमधील साधारण २५ सहस्र रुपये चोरले होते. या प्रकरणी बजपे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शबीक मूळचा तमिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्याचा रहिवासी आहे. चौकशीच्या वेळी शबीकने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. पोलिसांनी चोरीला गेलेली दानपेटी जप्त केली आहे. शबीकच्या विरुद्ध उडुपी जिल्ह्यातही चोरीचा गुन्हा नोंद आहे. शबीक तामिळनाडूहून या क्षेत्रात यायचा, चोर्‍या करायचा आणि पुन्हा तमिळनाडूला पळून जायचा, अशी माहिती अन्वेषणातून पुढे आली आहे.

संपादकीय भूमिका

  • देशात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशी स्थिती जगभरात सर्वत्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
  • शबीक कधी एखाद्या मशिदीत अशी चोरी करण्याचे धाडस का दाखवत नाही ?