हिंदुद्वेषी विनोदी कलाकार नसीफ अख्तर याचा भाग्यनगर येथे होणारा कार्यक्रम रहित

तेलंगाणातील हिंदूंच्या संघटित प्रयत्नांचा परिणाम !

भाग्यनगर (तेलंगाणा) – भारत, ब्राह्मण, हिंदूंची देवालये, तसेच हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अत्यंत अपमानास्पद वक्तव्ये करणारा विनोदी कलाकार नसीफ अख्तर याचा  कार्यक्रम येथे ३ एप्रिल या दिवशी होणार होता. या विरोधात हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी गच्चीबोली पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे  पोलिसांनी कार्यक्रम रहित केला.

विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्म आणि भारत देशाचा अपमान करणार्‍या या कार्यक्रमाला भाग्यनगरमध्ये अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली होती. यापूर्वी बेंगळुरू येथेही आयोजित अख्तर याच्या कार्यक्रमाला हिंदु राष्ट्र समन्वय समितीने विरोध करत तक्रार केल्यामुळे तो कार्यक्रमही रहित करण्यात आला होता.

भाग्यनगरमधील कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती नाकाराल्यानंतर नसीफ अख्तर याने एक व्हिडिओ प्रसारित करून भारतात होणारे पुढील सर्व कार्यक्रम रहित करत असल्याची माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • असे किती कार्यक्रम हिंदूंनी रहित करत बसायचे ? यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर विनोद करणार्‍यांना कठोर शासन करणारा ईशनिंदा कायदा केला पाहिजे. यासाठी आता हिंदूंनीच सरकारवर दबाव आणला पाहिजे !
  • हिंदूंची आस्थास्थाने आणि भारत यांच्याविषयी कुठल्याही माध्यमातून कुणीही अवमान करू धजावणार नाही, अशी पत हिंदू केव्हा निर्माण करणार ?