
भीमावरम् (आंध्रप्रदेश) – श्रीरामनवमीनिमित्त आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील आकिवीडू पेडपेट येथील अतीप्राचीन श्रीराममंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेले आमदार रघुराम राजू आणि त्यांच्यासमवेत गेलेले काही हिंदु भाविक यांच्यावर आसपासच्या ख्रिस्ती लोकांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक हिंदु भाविक गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर भीमावरम् रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. आक्रमण करणार्यांपैकी ३८ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला आहे. (भारतात अल्पसंख्याक समुदाय धोक्यात असल्याचा टाहो फोडणारे साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि धर्मनिरपेक्षतावाले अशा घटनानंतर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
Christians attack Hindus cleaning a Shri Ram temple in Akividu (Andhra Pradesh) 🚨
MLA Raghuram Raju demands strict punishment for those targeting devotees inside temples ⚖️
Those preaching “peace” expose their true face in such acts.
Why the silence from Congress & so-called… pic.twitter.com/vIJUJcfWLM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
आमदार रघुराम राजू यांनी सांगितले की, घायाळ भाविकांपैकी एकाच्या डोक्यात खिळा घुसला आहे, तर दुसर्या एका व्यक्तीवर १२ वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या अराजक घटनांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.
हिंदु मंदिरात हिंदूंवर आक्रमण करणार्या ख्रिस्त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाएरव्ही शांततेच्या गप्पा मारणारे ख्रिस्ती प्रत्यक्षात किती क्रूर असतात, हे यावरून लक्षात येते. अशांविषयी काँग्रेसवाले, पुरोगामी आदी गप्प का ? |
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !