काँग्रेसने घटनेला ‘आतंकवादी घटना’ म्हणण्यास दिला होता नकार !

बेंगळुरू (कर्नाटक) – बेंगळुरूतील विशेष न्यायालयात वर्ष २०२२ मध्ये मंगळुरू येथे कुकरमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी चालू होती. या वेळी अटक करण्यात आलेल्या महंमद शारिक याने न्यायालयात त्याचा गुन्हा मान्य केला आहे. या घटनेत सुनियोजित कट रचला गेला होता आणि लक्ष्य हिंदु मंदिरांच्या आसपासची क्षेत्रे होती.
🚨 Mangaluru Blast Accused Confesses in Court
2022 cooker blast prime suspect Mohammed Shariq has admitted his crime in court.
Yet back then, Congress refused to even label it a terrorist act.
❗Pattern is clear – soft-pedalling jihadi terror for politics.
⚠️ There is no… https://t.co/o6SqH4RKEV pic.twitter.com/C7h8hmNkIZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 31, 2026
कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी वर्ष २०२२ मध्ये आरोप केला होता की, (तत्कालीन) भाजप सरकारने या स्फोटाला जाणीवपूर्वक आतंकवादी घटना म्हणून सादर केले. भाजपकडे दाखवण्यासारखी ठोस कामगिरी नसल्याने राजकीय लाभासाठी हे सूत्र वाढवून सांगण्यात आले. ही घटना मुंबई, पुलवामा किंवा जम्मू-काश्मीरमधील घटनांसारखी आतंकवादी कारवाई होती का ?, असे प्रश्न उपस्थित केले होते.
काय आहे घटनाक्रम ?
कर्नाटकाच्या शिवमोग्गा येथील महंमद शारिक १९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका रिक्शामध्ये सुमारे ३ किलो स्फोटक कुकरमध्ये घेऊन जात होता. ‘टाईमर’मध्ये बिघाड झाल्यामुळे कुकर त्याच्या मांडीवरच फुटला आणि तो गंभीर घायाळ झाला. त्यानंतर त्याला मंगळुरूतील रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर त्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आली. शारिक हा इस्लामिक स्टेटशी संबंधित शिवमोग्गा गटाचा सदस्य होता. त्याचे अनेक आतंकवादी घटनांशी संबंध होते. सप्टेंबर २०२२ मधील शिवमोग्गा प्रकरणातही तो आरोपी होता. या प्रकरणात स्फोटक चाचणी करण्यात आली होती. यापूर्वीही देशविरोधी घोषणा लिहिल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. (अशा आतंकवाद्याला पोसत रहाण्याऐवजी फाशीचीच शिक्षा द्यायाला हवी, असेच जनतेला वाटते ! तसेच त्याची बाजू घेणार्या काँग्रेस पक्षावरही आतंकवादाला समर्थन देणारी कलमे लावून त्याच्यावर बंदी घातली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाकाँग्रेस जिहादी आतंकवाद्यांची समर्थक असल्याने ती असेच म्हणत आली आहे आणि म्हणत रहाणार आहे. यामुळेच तिच्यावर बंदी घालणे आता आवश्यक झाले आहे ! |
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश
Nimbooda Song Controversy : ओडिसाच्या इयत्ता ५ वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात हिंदी चित्रपटातील ‘निंबुडा निंबुडा’ या गाण्याचे बोल समाविष्ट !
Avinash Shukla’s Confession : चोरीचे पैसे प्रसाधनगृहात लपवायचो !
Sabarimala Gold Probe : शबरीमला सोने प्रकरणात ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’च्या माजी अध्यक्षांच्या विरोधात मिळाले पुरावे !
Varanasi Masjid Demolition : वाराणसीत दालमंडी रस्ता रुंदीकरण प्रकल्पांतर्गत ५ मशिदी पाडण्यास आरंभ