
नवी देहली – खरे सांगायचे, तर इराणचे तेल नियंत्रणात घेणे, ही माझी आवडती गोष्ट आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेकडे अनेक पर्याय आहेत. अमेरिकेतील काही लोक म्हणतात की, ‘तुम्ही असे का करत आहात?’ पण ते मूर्ख आहेत. कदाचित् आम्ही खार्ग बेट घेऊ, कदाचित् नाही. या बेटावर इराणचे संरक्षण फारसे भक्कम नाही आणि अमेरिका ते सहजपणे आपल्या नियंत्रणात घेऊ शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते ‘फायनान्शियल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
🚨 US-Iran Tensions Explode: “Deal or Iran Won’t Remain!” – Trump Warns 🚨
🌍 The situation between the US and Iran is heating up with strong statements and rising global concerns:
🔴 Trump’s Ultimatum:
“Iran must drop its stubbornness and hand over its uranium!” ⚠️📊 Bold… pic.twitter.com/loY9JJZljd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 31, 2026
१. खार्ग बेट उत्तर पर्शियन आखातात वसलेले असून ते इराणसाठी एक महत्त्वाचे तेल केंद्र आहे. इराणच्या तेल निर्यातीपैकी अनुमाने ९० टक्के येथून निर्यात होते. यामुळे ते त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
२. व्हाईट हाऊसच्या काही अधिकार्यांचा असा विश्वास आहे की, हे बेट नियंत्रणात घेतल्यास इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डची आर्थिक स्थिती पूर्णपणे दुर्बल होऊ शकते आणि युद्धाच्या समाप्तीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
३. दुसरीकडे इराणनेही संभाव्य आक्रमणाच्या शक्यतेने खार्ग बेटावर अतिरिक्त सैन्य आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
इराणने हट्टीपणा सोडावा आणि आम्हाला युरेनियम द्यावे ! – ट्रम्प
ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, जर इराणने अणूशस्त्रांचा आग्रह सोडला नाही, तर तो नष्ट होईल. सध्या इराण दुर्बल आहे. त्याचे नेते त्यांची अणूशस्त्रे सोडून देतील, आम्हाला त्यांचे संवर्धित युरेनियम देतील आणि आमच्या बहुतेक अटी मान्य करतील. त्यानंतर ते पुन्हा एक चांगला देश बनू शकतील.
युद्ध संपवण्यासाठी लवकरच करार होईल ! – ट्रम्प यांचा दावा
ट्रम्प पुढे म्हणाले की, इराणसमवेतचे युद्ध संपवण्यासाठी लवकरच करार होऊ शकतो. जर इराणने अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर इराणच शेष रहाणार नाही.
युद्ध कधी संपेल हे आम्ही ठरवू ! – इराणचे प्रत्युत्तर
इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकार्याने म्हटले आहे की, युद्ध कधी संपेल ?, हे इराण ठरवेल. अमेरिकेने यापूर्वी ‘युद्ध काही दिवसांत संपेल’ असा अंदाज वर्तवला होता. हे आमचे युद्ध आहे आणि जोपर्यंत आम्ही ट्रम्प अन् नेतान्याहू यांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत आम्ही स्वतःचा बचाव करणे थांबवणार नाही. इराणकडे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचा मोठा साठा आहे. यामुळे इराण दीर्घकाळ आक्रमणे चालू ठेवू शकतो.
इराणने अमेरिकेला तेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला ! – ट्रम्प यांचा दावा
ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने अमेरिकेला तेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी सांगितले की, आधी १० मोठ्या नौकांमधून तेल पोचवण्याची योजना होती; परंतु आता २० नौकांमधून तेल पाठवले जात असून त्याची वाहतूक दुसर्या दिवसापासून चालू होत आहे. आमच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चर्चा चांगल्या प्रकारे चालू असून आम्ही अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर प्रगती करत आहोत.
दुसरीकडे इराणने अमेरिकेसमवेत कोणतीही चर्चा चालू नसल्याचे सांगत ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे.
पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्कीये आणि इजिप्त यांच्यात झाली चर्चा !

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले की, इस्लामाबादमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्कीये आणि इजिप्त या ४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेली बैठक उपयुक्त ठरली. या बैठकीत प्रादेशिक परिस्थिती आणि युद्ध लवकर अन् कायमस्वरूपी संपवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा झाली.
इराणचा पाणी उत्पादन प्रकल्प बंद !
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने म्हटले आहे की, इराणचा खोंदाब जड पाणी उत्पादन प्रकल्प आता कार्यरत नाही. २७ मार्च या दिवशी झालेल्या आक्रमणात या प्रकल्पाची मोठी हानी झाली. या आक्रमणानंतर हा प्रकल्प पूर्णपणे बंद करण्यात आला असून तो आता कार्यरत नाही. या प्रकल्पात कोणतेही आण्विक साहित्य नव्हते.
युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले !
आखाती देशांतील युद्धाचा सर्वाधिक परिणाम डिझेलच्या किमतींवर झाला असून काही देशांमध्ये डिझेलचे दर ८१ टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर महागाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे. फिलिपिन्समध्ये डिझेलच्या किमतीत जगात सर्वाधिक, म्हणजे ८१.६ टक्के वाढ झाली आहे. यापाठोपाठ नायजेरियामध्ये ७८.३ टक्के, मलेशियामध्ये ५७.९ टक्के, आणि सिंगापूरमध्ये ४४ टक्के दरवाढ नोंदवण्यात आली आहे. विकसित देशांनाही याचा फटका बसला असून अमेरिकेत ४१.२ टक्के आणि जर्मनीमध्ये ३०.९ टक्के डिझेल महागले आहे. कच्चे तेल प्रति बॅरल ११६ डॉलरवर (९ सहस्र ७०० रुपयांवर) गेले आहे. ते पूर्वी प्रति बॅरल ७० ते ७५ डॉलर होते.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman