
वाशी – ‘विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्ट’ यांच्या वतीने संत श्री रामतनुमाता मंदिर, तुर्भे गाव येथे श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. २० ते २५ मार्च या कालावधीत श्रीरामरक्षास्तोत्र सहस्रावर्तने, श्रीरामतनुचरितायन, अखंड रामनाम गजर, हरिपाठ भजन झाले. समर्थभक्त अमेयबुवा रामदासी यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. पालखी सोहळाही पार पडला.
तुर्भे गावातील श्री साईबाबा मंदिर येथे रामनवमी उत्साहात साजरी झाली. या वेळी सकाळी अभिषेक, आरती, श्रीरामजन्म पाळणा, नंतर आरती, भंडारा झाला. सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.
वाशीगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीगाव येथे भाजप मुख्य जनसंपर्क कार्यालयात धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल, वाशी प्रखंड यांच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
वाशीगाव येथील ‘हिंदू संमेलन समिती, वाशीगाव’ आयोजित ‘हिंदु आणि हिंदुत्वासह संघयात्रा’ या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाणे विभागाचे सेवाप्रमुख अविनाश गव्हाणे यांचे, तर ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठाना’च्या प्रांत कार्यकारिणी सदस्या श्रीमती शीतल निकम यांचे स्वदेशी, पर्यावरण, समरसता, नागरिक अनुशासन आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवरील ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन