
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ६१ व्या अधिवेशनात पाकिस्तानवर टीका करण्यात आली. आर्थिक विकास आणि मानवाधिकारांचे उल्लंघन या विषयांवर या प्रसंगी चर्चा झाली. जपानने पाकने अफगाणिस्तानात केलेल्या आक्रमणांत निष्पाप अफगाण नागरिकांच्या मृत्यूसंदर्भातत गंभीर चिंता व्यक्त केली, तसेच एकूणच पाकमधील मानवाधिकार उल्लंघनाची तीव्र निंदा केली.
Japan slams #HumanRights violations in Pakistan at the @UN
But is mere condemnation enough? When will global bodies act decisively; cut economic lifelines & push for stronger measures instead of just words?#Balochistan #Pakistan #Baloch pic.twitter.com/Tke9iJeSPo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2026
जपानी मानवाधिकार कार्यकर्ते शुन फुजिकी यांनी सांगितले की, अनुमाने २७ जागतिक मानवाधिकार करारांचे बंधन असतांनाही पाकमध्ये त्यांचे गंभीर उल्लंघन चालूच आहे. पाकमध्ये सक्तीने बेपत्ता करणे, छळ आणि हत्या यांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदी असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक नागरिक पाकिस्तान सोडून पलायन करत आहेत किंवा भीतीत जीवन जगत आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या समावेशक दृष्टीकोनावर भाष्य !
अधिवेशनात ‘संभली ट्रस्ट’चे अध्यक्ष वीरेंद्र सिंह चौहान यांनी वंशविद्वेष, भेदभाव आणि असहिष्णुता या जागतिक आव्हानांकडे लक्ष वेधत समावेशकतेविषयी भारताच्या सक्रीय भूमिकेवर प्रकाश टाकला. भारताच्या राज्यघटनात्मक चौकटीतील संरक्षणात्मक उपाय समानतेला चालना देतात आणि नागरिकांना भेदभावापासून संरक्षण देतात, असेही त्यांनी या प्रसंगी नमूद केले.
बांगलादेशालाही इशारा !
बांगलादेशाचे माजी खासदार डॉ. महंमद हबीबे मिल्लत यांनी सांगितले की, बांगलादेशाने टिकाऊ आर्थिक विकासासाठी प्रयत्न करतांना सर्व धर्मांना समान महत्त्व देणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकासंयुक्त राष्ट्रांत पाकवर केवळ निंदा करून आता चालणार नाही. तर त्याचे आर्थिक स्रोत आवळून त्याच्यावर बहिष्कार घालणे जागतिक हिताचे आहे, हे संयुक्त राष्ट्रे केव्हा ओळखणार ? |
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman