चला ! शौर्य, भक्ती आणि हिंदु राष्ट्र यांचा संकल्प करू रामनवमीला !!

नवमीला राम जन्मला, तेज उजळले ।
अयोध्या झाली पावन धरा ।
रामनामाने धर्म, सत्य अन् न्याय यांचा ।
दीप उजळे जगती सारा ।। १ ।।

श्री. अमोल हंबर्डे

रामराज्य म्हणजे जनतेचे रक्षक ।
आदर्श राजा अन् प्रजाही दक्ष ।
जिथे नसे अन्यायाचा स्पर्श ।
तिथे फुले केवळ न्याय आदर्श ।। २ ।।

आजच्या युवकांनो उठा, उठा ।
तुमची लढाऊवृत्ती जागृत करा ।
स्वाभिमानाची ज्वाला पेटवा ।
अन् धर्ममार्गे पुढे चला ।। ३ ।।

हनुमंतासारखी हवी हृदयी भक्ती ।
अंगी भरावी त्याची शक्ती ।
रामदूताचा पराक्रम स्मरून मनी ।
दूर करा दोष-अहंची विकृती ।। ४ ।।

भक्तीमध्ये असो निष्ठा ।
शौर्यामध्ये असो ज्वाला ।
एकतेच्या बळावर उभा राहो ।
हिंदु राष्ट्राचा किल्ला आपुला ।। ५ ।।

सर्वत्र रामनामाचा गजर घुमो ।
प्रत्येक हृदयात क्षात्रतेज उजळो ।
सद्गुण, धर्म अन् न्याय जपत ।
हिंदु राष्ट्रनिष्ठेचा दीप जळो ।। ६ ।।

हिंदु संस्कृतीचा मान वाढवू ।
रामाच्या आदर्शांनी जीवन घडवू ।
धर्मरक्षण अन् धर्माचरण यांवर उभ्या ।
हिंदु राष्ट्राचा उज्ज्वल विचार रुजवू ।। ७ ।।

रामनवमीला पवित्र संकल्प करू ।
जीवनात रामाचा मार्ग आणू ।
हिंदु राष्ट्र-कृतींना(टीप १) ध्यास बनवू ।
चला, रामराज्याचे स्वप्न साकारू ।। ८ ।।

जय श्रीराम ! जय हनुमान ! धर्म, शौर्य आणि हिंदु संस्कृती यांचा विजय असो !

टीप १ – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करायच्या कृती

– श्री. अमोल हंबर्डे, फोंडा, गोवा. (२०.३.२०२६)