पाकिस्तानच्या ३ सैनिकी चौक्या उद्ध्वस्त
काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तात्पुरता युद्धविराम संपताच सीमेजवळ पुन्हा हिंसाचार भडकला. २५ मार्च या दिवशी झालेल्या गोळीबारात किमान २ नागरिक ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. अफगाणी अधिकार्यांच्या माहितीनुसार हा संघर्ष कुनार प्रांतातील नाराई आणि सरकानो जिल्ह्यांत झाला. या ठिकाणी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात तोफगोळे डागले.
१. अफगाण सीमारेषा दलाने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या ३ सैनिकी चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात १ व्यक्ती ठार झाल्याचा दावा अफगाण सैन्याने केला आहे; मात्र या दाव्यांना स्वतंत्रपणे दुजोरा मिळू शकलेला नाही. पाकिस्तानने मात्र गोळीबाराचा आरंभ अफगाण दलांनी केल्याचा आरोप केला आहे.
२. रमझानच्या कालावधीत दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली होती. यापूर्वी सौदी अरेबिया, तुर्कीये आणि कतार यांच्या विनंतीनंतर दोन्ही बाजूंनी संघर्ष थांबवण्यास सहमती दर्शवली होती. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई आक्रमणानंतर हा करार झाला होता.
३. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने पाकिस्तानमध्ये पुन्हा आक्रमणे चालू केल्याची घोषणा केली आहे. ही संघटना अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानची सहयोगी संघटना असल्याचे मानले जाते. वर्ष २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर या संघटनेने पाकिस्तानमध्ये आक्रमणांची तीव्रता वाढवली आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तान त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी कारवायांसाठी होऊ देत आहे. अफगाणिस्तान सरकारने हे आरोप नाकारले आहेत.

Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा