
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – माण तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात शेतकरी आणि मेंढपाळ यांना दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून ते मोठ्या संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
| उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे भूमीला भेगा पडल्या आहेत. पाणी नसल्यामुळे चारापिके जळून गेली आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकर्यांना महाग दराने चारा विकत घ्यावा लागत आहे. मेंढपाळ व्यवसायावरही मोठे संकट आले असून पाण्यासाठी मेंढपाळांना स्थलांतर करावे लागत आहे. |
उत्तर माणमधील मोगराळे, शिखरशिंगणापूर, मोही, थदाळे, पाचवड, राजवडी, जाधववाडी, येळेवाडी, अनुभुलेवाडी, घोडेवाडी, पांगरी, टाकेवाडी, वारुगड यांसह अनेक गावांना आजही हक्काच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. वर्षानुवर्षे निवडणुकीमध्ये मिळालेली आश्वासने हवेतच विरल्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आजही दुर्गम भागातील महिलांना पाण्यासाठी अनेक मैल पायपीट करावी लागत आहे. शासनाने त्वरित टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (अशी मागणी का करावी लागते ? येथे दुष्काळी परिस्थिती प्रत्येक वर्षी उद्भवत असतांना प्रशासनाने एवढ्या वर्षांत काही उपाययोजना का केल्या नाहीत ? – संपादक)
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !