उद्या २६ मार्च या दिवशी ‘श्रीरामनवमी’ आहे. त्या निमित्ताने…
२६ मार्च २०२६ या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्या निमित्ताने प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र (अर्थासहित) क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.
भाग १

श्रीगणेशाय नमः ॥ अस्य श्रीरामरक्षास्तोत्र-मन्त्रस्य ।
बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः ॥
सीता शक्तिः । श्रीमत् हनुमान् कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
अर्थ : श्री गणेशाला नमस्कार असो. या रामरक्षास्तोत्राचा बुधकौशिकऋषी हा कर्ता आहे. श्रीसीतारामचंद्र ही स्तोत्राची देवता आहे. स्तोत्रातील श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. श्री सीता ही स्तोत्राची शक्ती आहे. श्रीमान् हनुमान हा या स्तोत्राचा कीलक (आधारस्तंभ) आहे आणि श्रीरामचंद्राची कृपा व्हावी; म्हणून या स्तोत्राचा सतत पाठ (जप) करणे, हा या स्तोत्राचा विनियोग (उपयोग) आहे.
॥ अथ ध्यानम् ॥
ध्यायेदाजानुबाहुन्, धृतशरधनुषम्, बद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानन्, नवकमलदलस्पर्धिनेत्रम् प्रसन्नम् ॥
वामाङ्कारूढसीता, मुखकमलमिलल्,लोचनन् नीरदाभम् ।
नानाऽलङ्कारदीप्तन्, दधतमुरुजटा, मण्डलंरामचन्द्रम् ॥
॥ इति ध्यानम् ॥
अर्थ : श्रीरामाची ध्यानमूर्ती वरील श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे असावी.
आजानुबाहू (गुडघ्यापर्यंत लांब हात असलेला), धनुष्यबाण धारण केलेला, पद्मासन घालून बसलेला, पीतांबर नेसलेला, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे (पाकळीशी स्पर्धा करणारे) सुंदर नेत्र असलेला, प्रसन्न, दृष्टी डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखाकडे असलेला, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेला, अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित झालेला आणि भव्य जटामंडल मस्तकावर धारण केलेला, अशा श्रीरामचंद्राचे (आरंभी) ध्यान करावे.
चरितं रघुनाथस्य, शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरम् पुंसाम्, महापातकनाशनम् ॥ १ ॥
अर्थ : रघुनाथ (रघुकुलात श्रेष्ठ, रघुकुलाचा स्वामी) रामाच्या चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांएवढा आहे. यातील एकेक अक्षर (सुद्धा) मानवाच्या महापातकांचा नाश करणारे (करण्यास समर्थ) आहे.
ध्यात्वा नीलोत्पलश्यामम्, रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतञ्, जटामुकुटमण्डितम् ॥ २ ॥
अर्थ : निळ्या कमळाप्रमाणे श्यामल वर्ण असलेला, प्रफुल्लित कमळाप्रमाणे सुंदर डोळे असलेला, समवेत जानकी आणि लक्ष्मण असलेला अन् जटांच्या (जटारूपी) मुकुटामुळे जो शोभून दिसत आहे.
सासितूणधनुर्बाण,पाणिन् नक्तञ्चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुम्, आविर्भूतमजं विभुम् ॥ ३ ॥
अर्थ : हातांत तलवार आणि धनुष्य असून (पाठीवर) भाता बांधलेला, राक्षसांचा संहार करणारा अन् स्वतः जन्मरहित, सर्वव्यापी असूनही जगाच्या रक्षणासाठी सहज लीलेने अवतीर्ण झालेला आहे.
(क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022408.html
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !