गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील सीसीटीव्हीचे चित्रीकरण थेट पाकमध्ये जात असल्याचे झाले उघड !

नवी देहली – उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी जाळे उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही प्रणालीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या हेरगिरी जाळ्याद्वारे गाझियाबादमधील संवेदनशील ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे चित्रीकरण थेट पाकिस्तानात पाठवले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने देशभरातील सीसीटीव्ही नेटवर्कची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालय हे गुप्तचर विभाग आणि इतर यंत्रणा यांच्या समवेत मिळून देशभरातील सीसीटीव्ही नेटवर्कची तपासणी चालू करण्याच्या सिद्धतेत आहे.
🚨 Major Security Alert 🚨
Union Government to conduct nationwide inspection of CCTV cameras
📍 CCTV footage from Ghaziabad (Uttar Pradesh) allegedly found being transmitted to Pakistan
⚠️ China-made cameras flagged as a serious and ongoing hacking risk
Time to audit, secure,… pic.twitter.com/Y5cvMxAoU9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2026
चिनी कॅमेर्यांमुळे हॅकिंगचा धोका कायम !
१ एप्रिलपासून केवळ ‘हॅकिंगप्रूफ कॅमेरे’च विकले जातील, जे सरकारी सुरक्षा तपासणी उत्तीर्ण करतील. भारतात ८० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे चीनचे आहेत, ज्यामुळे डेटा चोरीचा धोका कायम असतो. सध्या ७ आस्थापनांचे ५३ मॉडेलच असे आहेत, जे प्रमाणित आणि सुरक्षित मानले गेले आहेत.
संपादकीय भूमिकाइस्रायलने इराणमधील रस्त्यांवरील सिग्नलही हॅक करून सर्व माहिती गोळा केली होती. भारताचे शत्रूदेशही असा प्रयत्न करत असल्याने आता भारताने सर्वच ठिकाणी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे ! |
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !
सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता