शेकडो हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्राची सामूहिक प्रतिज्ञा !

सांगली, २३ मार्च (वार्ता.) – जत येथील बसवेश्वर मंदिर, पलूस येथील श्री धोंडीराज महाराज समाधी मंदिर, कुंडल, भवानीनगर, तुजारपूर, ईश्वरपूर, तसेच विश्रामबाग येथील विविध मंदिरांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन सोहळा पार पडला. या वेळी उपस्थित शेकडो धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध होण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा केली.

शिंदे मळ्यातील धर्मप्रेमी श्री. अभिजित कोडक, श्री. महेश चव्हाण, ईश्वरपूर येथील श्री. अजित जाधव, जत येथील डॉ. किरण स्वामी आणि सौ. दीपा स्वामी, श्री. संजय हत्ती, श्री. विनायक चव्हाण, पलूस येथील श्री. विजय पाटील, नगरसेवक श्री. अमृत माळी, ‘श्री धोंडीराज महाराज मंदिरा’चे विश्वस्त श्री. संतोष पाटील, श्री. भीमराव खोत, कुंडल येथील श्री. आणि सौ. मिलिंद बुचडे, श्री. सागर हेंद्रे, श्री. सोमनाथ विभूते, श्री. तुकाराम लाड आणि अन्य अनेक धर्माभिमानी या वेळी उपस्थित होते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !