|

कर्णावती (गुजरात) – गुजरात विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आले आहे. आता सरकार याची अधिसूचना प्रसारित करेल. त्या दिनांकापासून हा कायदा लागू होईल. या कायद्यात प्रामुख्याने विवाह, घटस्फोट, वारसा हक्काची मालमत्ता आणि ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ यांविषयीची प्रावधाने आहेत. असा कायदा करणारे गुजरात हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. याआधी जानेवारी २०२५ मध्ये उत्तराखंडाने हा कायदा केला आहे. गोव्यात आधीपासून हा कायदा अस्तित्वात आहे.
या विधेयकाचा मुख्य उद्देश धर्माच्या पलीकडे जाऊन विवाह, घटस्फोट, मालमत्तेचा वारसा अधिकार आणि ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’साठी एक समान कायदेशीर चौकट तयार करणे हा आहे. विवाहाच्या १ वर्षाच्या आत घटस्फोट घेता येणार नाही.
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’संबंधी महत्त्वपूर्ण प्रावधाने !
१. राज्याचे नागरिक किंवा इतर राज्यातील गुजरातमध्ये रहाणार्या अशा जोडप्यांना एका महिन्याच्या आत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ची नोंदणी अनिवार्य असेल.
२. दोघांपैकी कुणीही २१ वर्षांपेक्षा अल्प वयाचा असल्यास त्याच्या/तिच्या पालकांना सूचित केले जाईल.
३. १ महिन्याच्या आत नोंदणी केली नाही, तर १० सहस्र रुपयांचा दंड अथवा ३ महिन्यांचा कारवास अथवा दोन्ही अशा प्रकारची शिक्षा असेल.
४. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून जन्माला आलेल्या मुलाला कायदेशीर मानले जाईल. ५. दोघे वेगळे झाल्यास महिलेला पोटगीचा अधिकार असेल.
‘हलाला’ या विकृत प्रथेवर बंदी !या कायद्यानुसार ‘हलाला’ पद्धतीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. याचा अर्थ एखादे मुसलमान जोडपे घटस्फोटाद्वारे वेगळे झाले असेल आणि त्यांना पुन्हा विवाह करायचा असेल, तर ते तसे करू शकतात; मात्र यामध्ये आडवी येणारी विकृत पद्धत ‘हलाला’ यावर पूर्ण प्रतिबंध घालण्यात आले आहे. हलाला म्हणजे मुसलमान महिलेला तलाक दिल्यानंतर तिला पुन्हा त्याच व्यक्तीशी विवाह करायचा असेल, तर त्यापूर्वी तिला दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावा लागतो. |
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !