चारचाकीने चिरडून केली होती हत्या !

उज्जैन (मध्यप्रदेश) – कॅनडात चारचाकीने चिरडून ठार झालेल्या उज्जैनच्या गुरकीरत सिंह मनोचा या विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबासमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, कॅनडा सरकार मृतदेह देण्यासाठी ४० सहस्र डॉलर (सुमारे ३५ लाख रुपये) जमा करण्यास सांगत आहे. तसेच अन्वेषणासाठी मृतदेह १५ दिवस कॅनडातच ठेवण्यास तेथील सरकारने सांगितले आहे. मृतदेह कॅनडातून उज्जैनला आणण्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल. अशा परिस्थितीत कुटुंबाने केंद्र आणि राज्य सरकार, तसेच स्थानिक प्रशासन यांच्याकडे साहाय्याची याचना केली आहे. गुरकीरत सिंह मनोचा याची दोन दिवसांपूर्वी कॅनडात चारचाकीने चिरडून हत्या करण्यात आली होती. (कॅनडातील भारतियांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारवर दबाव आणणे अपेक्षित आहे ! – संपादक)
गुरकीरतचे वडील गुरजीत सिंह यांचे म्हणणे आहे की, एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी शक्य नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याकडे आर्थिक साहाय्याची मागणी केली आहे.
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !