नवी देहली – ‘मेटा’ आस्थापनाच्या वर्ष २०२६ च्या नव्या अहवालात भारत जगातील सायबर फसवणुकीसाठी सर्वाधिक लक्ष्य बनलेल्या देशांपैकी एक आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘एआय’चा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – कृत्रिम बुद्धीमत्तेचा) वापर करून मोठ्या प्रमाणावर घोटाळे घडतांना दिसत आहेत.
एआयच्या माध्यमातून होणारे घोटाळे ओळखणे खूपच कठीण
अहवालानुसार सायबर घोटाळ्यांतर्गत सामाजिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे. त्यासमवेत संघटित गुन्हेगारी टोळ्या व्यवसायाप्रमाणे घोटाळे करत आहेत. एआयच्या साहाय्याने खोटे संभाषण, ई-मेल, संकेतस्थळ सिद्ध केले जात आहे. तसेच वेगवेगळ्या भाषांमध्ये सहज फसवणूक संदेश सिद्ध केले जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर पूर्ण खोटी व्यावसायिक यंत्रणा उभी करून लोकांना फसवले जाते. त्यामुळेच आता एआयच्या माध्यमातून होणारे घोटाळे ओळखणे पुष्कळच कठीण होऊ लागले आहे.
विदेशातून होत आहेत सायबर घोटाळे
अहवालामध्ये उल्लेख केल्यानुसार ‘न्युडीफाय अप्स’ नावाच्या एआयविषयी गंभीर चेतावणी देण्यात आली आहे. तसेच या अॅप्सद्वारे एखाद्याचे बनावट अश्लील छायाचित्र / व्हिडिओ सुलभपणे सिद्ध केले जातात. ‘डीपफेक’ (एआय वापरून सिद्ध केलेले असे बनावट छायाचित्र, व्हिडिओ किंवा आवाज, जे खरे असल्यासारखा वाटते; पण प्रत्यक्षात खोटे असते.) तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक धोकादायक बनले आहे. त्यामुळेच मेटाच्या अन्वेषणात असेही आढळले की, काही सायबर ऑपरेशन्स इराण, पाकिस्तान, रशिया आणि चीन यांसारख्या देशांशी संबंधित नेटवर्कमधून चालवले जात आहेत.
एआय आधारित फसवणुकीसाठी नवीन कायदे करणे आवश्यक
तज्ञांच्या मते, यासंदर्भात केवळ कडक स्वरूपाचे कायदे करून भागणार नाही, तर याकरता सर्वांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे अत्यावश्यक आहे. केवळ इथेच थांबून चालणार नाही, तर एआय आधारित फसवणुकीसाठी नवीन कायदे करणेही आता तितकेच आवश्यक झाले आहे.

भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड